भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

Devendra fadnavis

भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते. मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष ज्योत्स्ना दिघे यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी दिघे यांच्या समर्थकांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. दिघे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, समर्थकांनीही हाती शिवबंधन बांधले.

गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नेतृत्व असलेल्या अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांवरही सडकून टीका केली होती. तसेच दसरा मेळावा परंपरेनुसारच होणार आणि तो शिवतीर्थावरच होणार असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला होता. अमित शाहांमध्ये हिंमत असेल तर मुंबई महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका एका महिन्यात घेऊन दाखवाव्यात, असं इशारा ठाकरेंनी दिला होता.

मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच आगामी मुंबई पालिकेच्या निवडणूका जिंकण्याचा चंग हा शिवसेना आणि भाजपने बांधला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये आता आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. परंतु ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपच्या मुंबई जिल्हा उपाध्यक्षांनी प्रवेश केला असून भाजपची पुढील भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : गरीब माणसाकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील तर.., कपिल सिब्बलांची न्यायव्यवस्थेवर टीका