घरताज्या घडामोडीNCB छोटे मासे पकडण्यात व्यस्त, अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो ड्रग्जबाबत गप्प...

NCB छोटे मासे पकडण्यात व्यस्त, अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो ड्रग्जबाबत गप्प का?, काँग्रेसचा सवाल

Subscribe

अदानींच्या बंदरावर ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले याबाबत एनसीबी कारवाई करत नाही आहे?

एनसीबीने शनिवारी कोर्डेलिया क्रूझवर केलल्या धडक कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ ताब्यात घेतलं आहे. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. एनसीबीच्या कारवाईवर काँग्रेसकडून मात्र सवाल करण्यात आला आहे. एनसीबी छोटे मासे पकडण्यात व्यस्त आहे. मात्र अदानींच्या बंदरावर सापडलेल्या ३००० किलो ड्रग्जसंदर्भात कोणाच्या आशीर्वादाने गप्प आहे? असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे. अदानी पोर्टवर मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. पंरतु त्याबाबत अधिक तपास करण्यात आला नाही असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेस नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवर टीका केली आहे. एनसीबी छोट्या माशांना पकडण्यात व्यस्त आहेत. एनसीबीचे अधिकारी छोट्या माशांच्या मागे लागले आहेत. परंतु मोठ्या माशांवर कारवाई करण्याची वेळ आली की गप्प का? अदानींच्या बंदरावर ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले याबाबत एनसीबी कारवाई करत नाही आहे? एनसीबीचे अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने गप्प आहेत? राजाश्रय असणाऱ्यांच्या माध्यमातून ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांच्या संदर्भात एनसीबी का गप्पा आहे? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

- Advertisement -

एनसीबीची क्रूझवर कारवाई

एनसीबीने कॉर्डेलिया क्रूझवर शनिवारी कारवाई केली. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीने क्रूझवर कारवाई करत छापा टाकला. एनसीबीने क्रूझवर एमडी, कोकेन,चरस, एमडीएमए ड्रग्ज जप्त केले आहेत. एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह ८ जणांना अटक केली आहे. आर्यनला कोर्टाने एक रात्रीची एनसीबी कोठडी दिली असून आज पुन्हा आर्यन खानला कोर्टात हजर करण्यात येईल. त्याच्यासोबत आणखी ५ ते ७ जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : NCB DRUGS आर्यनसाठी सलमान खानची मन्नतवर धाव


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -