घरताज्या घडामोडीमुंबईचं वैभव म्हणजे कोळीवाडे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईचं वैभव म्हणजे कोळीवाडे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Subscribe

'मागील सहा महिन्यात माझा बहुतेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. पण मुंबईतील भूमिपूत्रांकडून माझा सत्कार होतोय. याचा मला सर्वात जास्त आनंद झाला आहे', असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोळी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

‘मागील सहा महिन्यात माझा बहुतेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. पण मुंबईतील भूमिपूत्रांकडून माझा सत्कार होतोय. याचा मला सर्वात जास्त आनंद झाला आहे’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वरळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोळी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी भाजप आणि शिंदे गटातल्या नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी शक्तिप्रदर्शन केले. तसेच, आमचा वरळीमध्ये सत्कार केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. (Mumbais glory is Koliwada says Chief Minister Eknath Shinde)

“मागील सहा महिन्यात माझा बहुतेक ठिकाणी सत्कार करण्यात आला. पण मुंबईतील भूमिपूत्रांकडून माझा सत्कार होतोय. याचा मला सर्वात जास्त आनंद झाला आहे. मुंबईचे वैभव म्हणजे कोळीवाडे. हा भूमिपूत्र हा मुळ मुंबईकर आहे. कोळी समाज हा शांत, प्रेमळ आणि जीवाला जीव देणारा आहे. दर्याचा राजा म्हणून कोळी राजाचा उल्लेख केला जातो. जेवढा प्रेमळ तेवढाच निडर आणि हिंमत बाज कोळी समाज आहे. समुद्राच्या वादळात उंच लाटांशी सामना करणारा कोळी बांधव आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांवेळी म्हणाले.

- Advertisement -

माझं कोळी व्यवसायाशी साम्य

“अनेक वादळं आलेली आपण पाहिली असतील. पण आपला कोळी बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या समुद्रात देखील आपला उदनिर्वाह आणि कुटुंबाला आर्थिक मदत मिळण्यासाठी मासेमारी करतो. हा कोळी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये राहत आहे. मलाही या कोळी बांधवांचा जिव्हाळा आहे. मी कोळी नसलो तरी, माझं कोळी व्यवसायाशी साम्य आहे. एकेकाळी माश्यांचा व्यवसाय मी करत होतो. मी भाऊच्या धक्क्यावर येऊन मासेमारांना जवळून पाहायचो. त्यामुळे माझे या कोळी समाजाशी साम्य आहे”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

- Advertisement -

बराक ओबामांनी कोळी नृत्यावर ठेका धरला

आपल्या कोळी बांधवाच्या प्रसिद्ध असलेल्या कोळी नृत्यावर एकेकाळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही ठेका धरला होता. त्यामुळे कोळी बांधवांची परंपरा, संस्कृती जोपासली व वाढवली पाहिजे.

दोन पीलरमधील अंतर वाढवणे ही तुमची मागणी

“दीड वर्षांपूर्वी आपण या ठिकाणी आंदोलन केले होते. आंदोलन म्हणजे तुमचा कोस्टल रोडला विरोध नव्हता. केवळ कोस्टल रोडच्या कामासाठी टाकण्यात आलेल्या दोन पीलरमधील अंतर वाढवणे ही तुमची मागणी होती. परंतु त्यावेळी सत्तेची हवा ज्यांच्या डोक्यात असते त्यांना या छोट्या-मोठ्या सर्वसामान्य लोकांकडे लक्ष देण्याची वेळ नसते. त्यावेळी देखील हुकूमशाही पद्धतीने तुमची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर काही सुनावणी झाली नाही. मात्र आपले सरकार आल्यानंतर आमदारांनी आपला कोस्टल रोडबाबतचा विषय माझ्याकडे घेऊन आले होते. त्यावेळी मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली. त्यानंतर बऱ्याच बैठका झाल्या आणि आपली दोन पीलरच्यामधील अंतर वाढवण्याची मागणी पूर्ण केली. त्यावेळी आम्ही हे अंतर १२० मीटरचे झाले पाहिजे असे ठरवले आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेतला”, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


हेही वाचा – एकनाथ शिंदे छोटी नाहीतर मोठी आव्हानं स्वीकारतो; आदित्य ठाकरेंवर पलटवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -