Homeमहाराष्ट्रकोकणMumbai Goa Expressway : कशेडी घाटातील बोगदा लवकरच सुरू होणार; समोर आली...

Mumbai Goa Expressway : कशेडी घाटातील बोगदा लवकरच सुरू होणार; समोर आली ही तारीख

Subscribe

मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचा मानला जाणारा कशेडी घाट क्षेत्रातील बोगदा रहदारीसाठी लवकरच सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षापासून मुंबई – गोवा महामार्गाबाबत चर्चा सुरू आहेत. गेल्या 18 वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? याबाबत विचारणा मुंबई ते गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांकडून केली जात आहे. अशामध्ये मुंबई ते गोवा असा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि चांगली बातमी समोर आली आहे. या महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून पूर्ण क्षमतेने सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने बांधकाम प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, येत्या 26 जानेवारीपासून हे बोगदे प्रवासासाठी सुरू केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Mumbai Goa Expressway kashedi ghat tunnels open soon)

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दोन्ही बोगदे नवीन वर्षाच्या सुरुवातील म्हणजेच 26 जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागचे अभियंता पंकज गोसावी यांनी एका मराठी वृत्तपत्राला दिली आहे. त्यामुळे आता मुंबई – गोवा महामार्गावरील प्रवास हा आणखी सुखकर होणार आहे. कशेडी घाट हा या महामार्गावरचा सर्वांत अवघड आणि धोकादायक घाट आहे. या घाटात अंदाजे 2 किलोमीटरचे येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आले आहेत. यामुळे 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 8 मिनिटांमध्ये होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

गणेशोस्तवासाठी कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी एक बोगदा सुरू करण्यात आला होता. पण काही त्रुटी आढळल्याने दोन्ही बोगदे बंद करण्यात आले होते. वीजेची कामे करण्यासाठी आणि बोगद्यात होत असलेल्या पावसाच्या पाण्याची गळतीमुळे हे बोगदे अनेकदा चर्चेचा विषय ठरले होते. राज्यातील अनेक नेत्यांनी यावेळी या बोगद्याची पाहणीदेखील केली होती. समोर आलेल्या माहितीनुसार, कशेडी येथील दुसऱ्या बोगद्यामध्ये पंखे बसवण्याचे काम सुरू आहे. तसेच, रायगडमधील भोगाव जवळ एका पुलावर स्लॅब टाकण्याचे कामही सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना लवकरच या बोगद्याचा लाभ घेता येणार आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…