घरमहाराष्ट्रमुंबई-गोवा महामार्गाचे तीन तेरा ! प्रवाशांचे वाजले बारा !

मुंबई-गोवा महामार्गाचे तीन तेरा ! प्रवाशांचे वाजले बारा !

Subscribe

खड्डे बुजवल्याचा दावा फोल

मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अद्याप दयनीय असल्याने या मार्गाला वाली कोण, असा संतप्त सवाल या मार्गावरून प्रवास करणारे विचारत आहेत. गणेशोत्सवाला जाताना प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे खड्डे बुजविण्याचा दावा करणारे सपशेल अपयशी ठरल्याचेही बोलले जात आहे.

या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने खोदकामामुळे अनेक ठिकाणी नवीन व जुना रस्ता एकमेकांना जोडण्यात आला. त्यामुळे वाहनचालकांची फसगत होत आहे. काही ठिकाणी नव्याने खड्डे भरण्याचे केलेले काम कुचकामी ठरले. त्यामुळे जागोजागी भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता जोडलेल्या ठिकाणी लावलेले सिग्नल बंद असल्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी मातीचा वापर करण्यात आल्याने अनेक ठिकाणी चिखल पसरला आहे. त्यावरून दुचाकी घसरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यात तुंबणार्‍या पाण्याचा निचरा होत नसून काही दिवसातच तेथे खड्डे पडत आहेत.

- Advertisement -

खड्डेमय रस्त्यामुळे कंबर, पाठदुखीसारख्या व्याधी बळावत चालल्या असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. प्रवासही वेळखाऊ झाल्यामुळे या मार्गावरील प्रवासच नको, अशी भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे. महामार्गाच्या सुमार दर्जामुळे प्रवासी मेटाकुटीला आले असताना कोकणातील लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून शांत बसले आहेत. त्यामुळे लोकांच्या संतापात अधिकच भर पडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -