Homeताज्या घडामोडीMumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; 4 जणांचा मृत्यू तर, दोन...

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; 4 जणांचा मृत्यू तर, दोन गंभीर जखमी

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत.

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील वीर रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत स्कॉर्पिओला टोइंग व्हॅनने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याचे समजते. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारांसाठी दाखल करण्यात आले असून पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. (mumbai goa highway accident 4 people died on the spot 2 were seriously injured)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात सूर्यकांत सखाराम मोरे, साहिल नथुराम शेलार, प्रसाद रघुनाथ नातेकर, समीर मिंडे (35) या चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं समजतं. तर, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत सूर्यकांत मोरे व प्रसाद नातेकर हे महाडचे रहिवाशी आहेत. स्कॉर्पिओमधील डिझेल संपल्यानं चालकाने स्कॉर्पिओ रस्त्याच्याकडेला उभी केली होती. त्यावेळी चिपळूणहून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅनने स्कॉरपीओला धडक दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अधिक तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी पोलिसांनी टोइंग व्हॅनच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत, त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारारकरिता दाखल करण्यात आले आहे.

धारावीत भीषण अपघात

मुंबईतील धारावी परिसरात असलेल्या टी जंक्शनजवळ शुक्रवारी पहाटे (ता. 03 जानेवारी) एका अवाढव्य ट्रेलरने काही गाड्यांना धडक दिल्याने तब्बल सहा वाहने मिठी नदीच्या पात्रात कोसळली. यामध्ये काळी-पिवळी टॅक्सी आणि टेम्पो या वाहनांचा समावेश आहे. ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – Beed : बीड सरपंच हत्येप्रकरणी तीन आरोपी पाहिजेत; पोलिसांची जाहिरात प्रसिद्ध