मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख कोरोना पॉझिटिव्ह

Mumbai Guardian Minister Aslam Sheikh

ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. अस्लम शेख यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्यांना स्वत:ची चाचणी करण्याचं आवाहन शेख यांनी केलं आहे. अस्लम शेख स्वत: विलगीकरण केलं आहे. लक्षणं नसल्यामुळे घरुन काम करत राहणार असल्याचं अस्लम शेख यांनी सांगितलं.