परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

देशमुखांचा राजीनामा घेतला नाहीतर राजकारणात नवा पायंडा पडेल - पाटील

Mumbai High Court orders CBI probe into allegations made by Parambir Singh against Home Minister
परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांची CBI चौकशी होणार, मुंबई उच्च न्यालायाचा आदेश

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधा हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी करण्यात आली. त्यांची याचिका मान्य करुन परमबीर सिंह यांच्या आरोपांवर सीबीआय चौकशी करण्याचा हायकोर्टाने आदेश दिला आहे. येत्या १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश सीबीआयला देण्यात आले आहेत. राज्य सरकारची यंत्रणांवर कोणताही ताण येऊ नये तसेच चौकशी निपक्षपाती व्हावी यासाठी हायकोर्टाने सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

राज्याच्या गृहमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे तपास करताना राज्यातील यंत्रणेवर दबाव येऊ नये यासाठी तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या तपासाचा अहवाल येत्या १५ दिवसांत हायकोर्टाकडे सादर करण्याचे निर्देश सीबीआयला देण्यात आले आहेत. या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांध्ये किती तथ्य आहे. तसेच आरोप किती खरे आहेत. यासंदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतो का असा अहवाल सादर करायचा आहे. यानंतर तपासाचा आणि प्रकरणाची पुढची दिशा ठरविण्यात येणार आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणामुळे अडचणीत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनीच सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटींची खंडणी वसूल करण्याचे टार्गेट दिले होते. असा खळबळजनक आरोप सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात केला.

थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा – अतुल भातखळकर

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात परमबीर सिंह यांनी केलेल्या १००कोटीच्या वसुलीच्या आरोपांची गंभीर दखल घेत याप्रकरणी CBI चौकशीचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. देशमुखांना हटवण्याचे बळ मुख्यमंत्र्यांमध्ये नाही,थोडी तरी लाज शिल्लक असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. अशी मागण भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

चौकशी होईपर्यंत पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही – दरेकर

उच्च न्यायालयाने परमबीर सिंहांच्या याचिकेवर सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रकरण गंभीर आहे, निष्पक्ष चौकशी होईलच. पण किमान चौकशी होईपर्यंत गृह मंत्र्यांनी पदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, न पेक्षा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे.

राजीनामा न घेतल्यास राजकारणात नवा पायंडा पडेल – पाटील

अनिल देशमुखांवर जे आरोप झाले आहेत त्यावर हायकोर्टाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. ५ हजार वर्षाचा जो अज्ञात इतिहास आहे आणि २ हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे. त्याच्यामध्ये असत्य कधीही कायमस्वरुपी लपून राहिले नाही त्यामुळे आता सत्य बाहेर पडणार, सीबीआय चौकशी लागून सुद्धा देशमुखांचा राजीनामा घेतला नाहीतर राजकारणात नवा पायंडा पडेल. पवार साहेबांनी ५४ वर्षात त्यांच्या राजकीय काळात नेहमीच न्यायासाठी काम केले आहे. धनंजय मुंडे, देशमुखांचा राजीनामा असुदेत त्यांच्या सारख्या संवेदनशील माणसाला वाटलेच असेल की राजीनामा घेतला पाहिजे. परंतु शरद पवारांचे पक्षात चालत नसल्याचे दिसत आहे. सीबीआय चौकशी लागलेला माणुस मंत्रिमंडळात राहू शकत नाहीत अशी आमची भूमिका असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुरावे जमवण्याचा प्रयत्नही केला हे संशयास्पद – सचिन सावंत 

दुर्दैवी निर्णय असे म्हणावे लागेल अशा प्रकारचा पायंडा पडला तर याचे भविष्यात दुर्गामी दुष्परिणार देणारा आहे. याचे कारण असे आहे की, कोणत्याही प्रकारचे पुरावे दिले नाही तसेच पोलीस आयुक्त असताना कारवाई का केले नाही तेव्हा का कारवाई केली नाही. नंतर कारवाई केल्यावर का तक्रार केली. तसेच पदावर असताना पुरावे जमवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला हे संशयास्पद आहे. भाजपमध्ये काही मंत्र्यांविरोधात लाचखोरी, बँकेचे फ्रॉड केल्याचे गुन्हे होते तेव्हा त्या मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही असेही काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.