आनंदराव अडसूळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळली

mumbai high court rejects Anandrao Adsul Plea against ed summoned
आनंदराव अडसूळांना हायकोर्टाचा दणका, ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळली

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात ईडीने कारवाई सुरु केली आहे. ईडीचे अधिकारी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्याप्रकरणात कारवाई करत आहेत. आनंदराव अडसूळ यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले होते. अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहे. परंतु ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी आनंदराव अडसूळ यांनी हायकोर्टात धाव घेतली होती पंरतु हायकोर्टाने अडसूळ यांची याचिका फेटाळली आहे. याचिका फेटाळली असल्यामुळे आनंदराव अडसूळ यांना आता चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांना ईडीने घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहेत. आनंदराव अडसूळांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. आनंदराव अडसूळ यांना समन्स बजावल्यानंतर त्यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले होते. परंतु अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेत ईडीचे समन्स रद्द करण्यासाठी याचिका केली. परंतु हायकोर्टाने याचिका फेटाळली आहे.

प्रकरण काय आहे?

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. आमदार रवी राणा यांनी अडसूळ यांच्यावर मुंबईतील सिटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी तक्रार देखील केली होती. या पार्श्वभूमीवर ईडीने अडसूळ पिता-पुत्रांना समन्स बजावलं आहे. आनंदराव अडसूळ यांनी सिटी बँकेत भ्रष्टाचार करत सर्वसामान्य ठेवीदार, गोरगरीब नागरिक, ज्येष्ठ पेंशनधारक यांची आयुष्यभराची जमा रक्कम आणि गिरणी कामगारांचे पैसे परस्पर लाटल्याचा आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.


हेही वाचा : नाराज वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार? त्या पोस्टरवरुन चर्चांना उधाण