घरट्रेंडिंगमुंबईच्या हॉटेलचालकाचा ACसाठी देसी जुगाड, व्हिडीओ व्हायरल

मुंबईच्या हॉटेलचालकाचा ACसाठी देसी जुगाड, व्हिडीओ व्हायरल

Subscribe

देसी जुगाड करण्यात भारतीयांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. पैसे वाचवायचे झाले तर 'मध्यमवर्गीय'पेक्षा कोणीही मोठा नाही. तसे, आपण आपल्या रोजच्या जीवनात एकापेक्षा एक जुगाडू करत आणि पाहत असतो. याचाच प्रत्यय देणारा एक फोटो खूप व्हायरल होत आहे.

देसी जुगाड करण्यात भारतीयांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. पैसे वाचवायचे झाले तर ‘मध्यमवर्गीय’पेक्षा कोणीही मोठा नाही. तसे, आपण आपल्या रोजच्या जीवनात एकापेक्षा एक जुगाडू करत आणि पाहत असतो. याचाच प्रत्यय देणारा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. एक एसी दोन खोल्यांमध्ये डिव्हाइड करण्यात आल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एसीचा देसी जुगाड मुंबईतील हॉटेलमधला आहे. तसेच, या फोटो आणि एसी दोन खोल्यांमध्ये डिव्हाइड करण्यामागची संकल्पनाही गमतीशीर आहे. (mumbai hotel desi jugaad one split ac split between two rooms photo goes viral)

मल्टीमीडिया कलाकार आणि पॉडकास्टर अनुराग मायनस वर्मा यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. 10 ऑक्टोबर रोजी @confusedvichar या ट्विटर हँडलने शेअर केले होते. या फोटोला आतापर्यंत 7,000 हून अधिक लाईक्स आणि 500 हून अधिक रिट्विट्स केले आहे. तसेच, “2011 साली मुंबईत ही रूम बुक केली होती, जिथे मॅनेजरने स्प्लिट एसीचे आश्वासन दिले होते. खोलीत स्प्लिट एसीही होता, पण तो दोन खोल्यांमध्ये विभागलेला होता. खरंतर अर्धा एसी आमच्या खोलीत होता तर अर्धा शेजारच्या खोलीत होता, ज्यात दोन काका राहत होते आणि पहाटे चारपर्यंत ते मोठ्या आवाजात ‘ए गणपत चल दारू ला’ गाणं वाजवत होते”, असे अनुरागने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे.

- Advertisement -

हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्संनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी विचारले रिमोट कोणाकडे आहे? त्यावर संबंधित युजर्सने उत्तर दिले की रिमोट नाही, त्यामुळे तो एसीचे तापमान कमी करू शकत नाही किंवा बंदही करू शकत नाही. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर एका युजर्सने मजेशीरपणे म्हटले की, आता हे प्रकरण राष्ट्रीय विषय बनले आहे! त्याच वेळी, इतर काही युजर्संनी हॉटेलचे नाव आणि ठिकाण विचारण्यास सुरुवात केली. तर काही नेटकरी यावरून भन्नाट मीम्स व्हायरल करत आहेत.

व्हायरल होणाऱ्या फोटोत दोन खोल्यांमध्ये एक स्प्लिट एसी बसवण्यात आली आहे. ही एक एसी अशाप्रकारे बसवण्यात आली आहे की त्यामुळे दोन्ही खोल्यांमधील लोकांना त्याचा लाभ घेता येत आहे. दोन्ही खोल्यांमध्ये एकाच वेळी गारवा होण्यासाठी भिंतीमध्ये एक छिद्र तयार केले गेले आहे.

- Advertisement -

@Gulzar_sahab या ट्विटर हँडलने १० ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये आपण उत्तर प्रदेशातील रस्ते जीर्ण अवस्थेत पाहू शकतो. काही तरुण बसच्या वायपर्सवर कमेंट करत आहेत. वास्तविक बसचा वायपर खराब आहे, पावसात त्याचा वापर करण्यासाठी चालकाने दोरी आणि प्लास्टिकच्या बाटलीचा अप्रतिम जुगाड केला आहे. बसच्या वर UP Roadways आणि खाली Meerut असे लिहिलेले आहे. प्लास्टिकच्या पाण्याची बाटलीही विंडशील्डला लावलेल्या वायपरच्या साहाय्याने दोरीच्या साहाय्याने लटकत असल्याचे दिसून येते. बसच्या ड्रायव्हरने दोरीवरून वायपर ओढताच ती बाटलीच्या वजनाने पुन्हा जागेवर येते. या जुगाडामुळे वायपरमध्ये बिघाड होऊनही चालकाला पावसाळ्यात बसची काच व्यवस्थित साफ करता येते.


हेही वाचा – मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 4 नोव्हेंबरपासून

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -