घरताज्या घडामोडीदेशात मुंबई सगळ्यात उष्ण शहर, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

देशात मुंबई सगळ्यात उष्ण शहर, हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Subscribe

ऐन हिवाळ्यात मुंबईत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात मुंबई सर्वात उष्ण शहर ठरले आहे. मागील दोन दिवसांपासून सांताक्रूझमध्ये 35 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शहराचे कमाल तापमान 35.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. तर गुरुवारी शहरात 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरीत 35.4 अंश सेल्सिअस, पुणे 32.3 अंश सेल्सिअस आणि डहाणू 31.8 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

उष्णतेची लाट कधी येते?

जेव्हा किनारी प्रदेशाचे तापमान 37 अंशांपर्यंत पोहोचते आणि 4.5 ते 6.4 अंशांच्या दरम्यान सामान्य पासून निर्गमन होते. तेव्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला जातो. जेव्हा तापमानात वाढ एकापेक्षा जास्त स्टेशनवर आणखी दोन दिवस टिकते, तेव्हा प्रदेशासाठी उष्णतेची लाट घोषित केली जाते.

- Advertisement -

अरबी समुद्रातील बदलामुळे मुंबईला ढगांचे आच्छादन दिसून येत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये शहरात ईशान्येकडील वारे वाहतील, ज्यामुळे तापमानात घट होईल, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. सलग दोन दिवस सांताक्रुझ वेधशाळेने सर्वाधिक तापमानाची नोंद केली आहे. परंतु आणखी काही दिवस मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : … तर आम्ही तिथे नाक खुपसायला जात नाही, अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -