घरमहाराष्ट्रमुंबईकरांसाठी खुशखबर : कमला नेहरू पार्कमध्ये प्रथमच उभारणार काचेचा पूल

मुंबईकरांसाठी खुशखबर : कमला नेहरू पार्कमध्ये प्रथमच उभारणार काचेचा पूल

Subscribe

 

मुंबई: वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क येथे मुंबई महापालिकेकडून काचेचा पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकर व देश – विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी काचेचा पूल एक वेगळी पर्वणी ठरणार आहे.

- Advertisement -

तसेच, या दोन्ही उद्यानाच्या ठिकाणी वृक्षसंपदा जोपासून वाढविण्याचा पालिका प्रशासनाचा मानस आहे.
मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्कमधील विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. वाळकेश्वर (मलबार टेकडी) च्या माथ्यावर असलेले सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क हे मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये गणले जातात. या ठिकाणी निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मुंबईकरांसह असंख्य पर्यटक दररोज भेट देत असतात.

- Advertisement -

हेही वाचाःShasan Aplya Dari : अनधिकृत फेरीवाल्यांपासून मुंबईकरांची सुटका करा – दीपक केसरकर

राज्यात शिवसेना – भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. तेव्हापासून मुंबईचा विकास झपाट्याने होऊ लागला आहे. मुंबईचे सुशोभिकरण व विकासकामे गतिमान पद्धतीने होत आहेत. मुंबईत पर्यटकांची गर्दी वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना, प्रयोग अस्तित्वात येत आहेत.

ठरू शकेल ‘सेल्फी पॉईंट’

मुंबई महापालिकेची शहर व उपनगरे येथे अनेक उद्याने आहेत. पालिकेच्या राणी बागेत लाकडी पूल आहे. मात्र काचेचा पूल कोणत्याही उद्यानात नाही. मुंबईत सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क येथे प्रथमच ‘ काचेचा पूल’ उभारण्यात येणार आहे. ह्या काचेच्या पुलाची लांबी १० मिटर तर रुंदी ४.५ मिटर एवढी असणार आहे.
या पुलावर एका वेळी किमान ४ – ५ जण उभे राहू शकतील, अशी या पुलाची क्षमता असणार आहे. हा काचेचा पूल एकदा उभारला गेला की, त्याच्या आकर्षणाने पर्यटकांची गर्दी वाढणार असून कदाचित काचेचा पूल हा भविष्यात ‘ सेल्फी पॉईंट’ ठरू शकेल.

सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क

सर फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू पार्क येथे हिरवळ, शोभेची झाडे, फुलझाडे, गॅझेबो, पर्यटकांच्या आसनव्यवस्थेसाठी विविध आकर्षक बाकडे, सेल्फी पॉइंट, रंगीबेरंगी प्रवेशद्वार आदी बाबी उद्यानांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यामुळे ही दोन्ही उद्यान पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत. तसेच दोन्ही बागांचे क्षेत्रफळ अंदाजे ३५००० चौरस मीटर आहे. याशिवाय उद्यानात पाथवे, पर्यटकांसाठी खान-पानाची जागा, खेळाची उपकरणे, इको पॉइंट, फिश पॉन्ड, लोटस पॉन्ड, समर हाऊस, पृथ्वी कारंजे, गॅझेबो, एक्यूप्रेशर वॉल, बेअर लँड स्लोप भाग आदी सुविधा आहेत. तसेच जवळपास १५००० चौरस मीटर जागा बागेच्या आवारातील रँक वनस्पतींनी व्यापलेली क्षेत्र आहे. तसेच उद्यानात अडीच हजार बहरलेली झाडेही आहेत. म्हातारीच्या बुटासह कमला नेहरू पार्कमध्ये दहा फूट उंचीचा शंख उभारण्यात आला असून, तो पर्यटकांचे सेल्फीसाठी लक्ष वेधून घेत आहे.

जॉगिंग ट्रॅकला मिळणार नवीन रुपडे

सर फिरोजशाह मेहता उद्यानमधील जॉगिंग ट्रॅकवर लवकरच विटांचा खच टाकून ट्रॅक नव्याने तयार करण्यात येणार आहे. या नव्या कामामुळे येथे फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना धुळीचा त्रास होणार नाही. तसेच चालताना पायांना आरामदायी वाटेल. तसेच या नवीन कामामुळे जॉगिंग ट्रॅक भुसभुशीत होणार असून, नागरिकांना चालताना नक्कीच फायदा होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -