Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMumbai Local : केंद्राकडून मुंबईसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट

Mumbai Local : केंद्राकडून मुंबईसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट

Subscribe

केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईकरांसाठी खास गिफ्ट केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी केंद्र सरकार नवीन 300 लोकल देणार आहे.

मुंबई : केंद्र सरकारने मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईकरांसाठी खास गिफ्ट केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. मुंबईकरांसाठी केंद्र सरकार 300 नव्या लोकल देणार आहे. तसेच वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल्स देखील उभारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपा नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली असून यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार देखील मानले आहे. (Central Government gift 300 new local trains to mumbai)

हेही वाचा : Pawar Vs Shinde : ‘CM’पद ‘Bjp’ कडे, दुसऱ्या क्रमांकासाठी शिंदे अन् अजितदादांमध्ये रस्सीखेच; भाजपचे बडे नेते म्हणाले, “तिघेही…”

- Advertisement -

राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 132 जागा जिंकणाऱ्या महायुतीने आता मुंबई महापालिकाच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचे चित्र दिसत आहे. याचदरम्यान केंद्र सरकारकडून मुंबईकरांसाठी रेल्वेच्या तीन योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतल्या उपनगरीय लोकल सेवेत आता 300 नव्या गाड्यांचा भर पडणार आहे. पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची, तसेच मध्य रेल्वेवरच्या परळ, लोकमान्य टिळक टर्मिनल, कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे दिसून आले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकांवर नवी टर्मिनल्स उभी करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे. भाजपा नेते तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : Mahayuti : मराठवाड्यातील सर्वात ज्येष्ठ आमदाराचे मंत्रिपदासाठी अर्जव; म्हणाले, 40 वर्षे भाजपचा निष्ठावान अन् निष्कलंक 

- Advertisement -

तसेच यावेळी सिंधुदुर्गातील पाणबुडी पर्यटन प्रकल्पासाठी 47 कोटी तर नाशिकमध्ये रामकाल पथच्या विकासासाठी 99 कोटींचा निधी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. राज्यातली पर्यटनस्थळे जागतिक दर्जाची करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -