घरताज्या घडामोडीरेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

Subscribe

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. देखभालीचे काम करण्यासाठी आज उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. (mumbai local train mega block today on central and harbour line)

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- विद्याविहारण स्थानकांदरम्यानच्या दोन्ही धीम्या मार्गावर तसेच हार्बरच्या पनवेल- वाशीदरम्यानच्या दोन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावणार आहेत.

- Advertisement -

मध्य रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)- विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे योग्य डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

- Advertisement -

घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि या स्थानकांदरम्यान कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.

हार्बर रेल्वे मार्गांवरील मेगाब्लॉक

पनवेल – वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणाऱ्या व ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

  • ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
  • ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

हेही वाचा – अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा आज निकाल, ठाकरेंच्या मशालीला कौल मिळणार का?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -