घरताज्या घडामोडीनागरिक समजून महापौरांचा फोन टाळला, थेट वॉररुम गाठून कर्मचाऱ्यांनाच झापले

नागरिक समजून महापौरांचा फोन टाळला, थेट वॉररुम गाठून कर्मचाऱ्यांनाच झापले

Subscribe

मुंबईकर खूप त्रस्त आहेत. त्यांना अधिक त्रास देऊ नका.

कोरोना बाधित रुग्णाला तात्काळ बेड व आरोग्य सुविधा उपल्बध करण्यासाठी मदत व्हावी या उद्देशाने पालिकेने ठिकठिकाणी वॉर रूम सुरू केले आहेत. मात्र काही ठिकाणी नागरिकांच्या फोनला प्रतिसाद दिला जात नाही. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी, स्वतः दहिसर वॉर रूमला तीन वेळा संपर्क केला मात्र दाद मिळाली नाही. चौथ्यांदा फोनला प्रतिसाद लाभला. त्यामुळे महापौरांनी थेट दहिसर वॉर रूम गाठले आणि तेथील कर्मचारी वर्गाला चांगलेच झापले. त्यामुळे त्या कर्मचारी वर्गाची बोलतीच बंद झाली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असताना नागरिकांना सरकारी, पालिका व खासगी रुग्णालयात बेड, आयसीयू बेड, ऑक्सिजन मिळत नाहीत. पालिकेने रुग्णांना तात्काळ बेड व आरोग्य सुविधा मिळण्यासाठी ठिकठिकाणी वॉर रूम सुरू केले आहेत. मात्र दहिसर येथील वॉर रूममध्ये नागरिकांच्या फोनला दाद दिली जात नाही,अशा तक्रारी प्राप्त झाल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी, स्वतः या वॉर रुमला एक , दोन नव्हे तर तीन वेळा फोन लावले तरी त्यास वॉर रूममधून दाद मिळाली नाही. अखेर चौथ्यांदा महापौरांनी फोन लावला आणि त्यास प्रतिसाद मिळाला. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेऊन महापौरांनी दहिसर वॉर रूमला तात्काळ भेट दिली. तेथील कर्मचारी वर्गाला चांगलेच फैलावर घेऊन फटकारले.

- Advertisement -

मी स्वतः नागरिकांच्या तक्रारींबाबत खातरजमा करण्यासाठी दहिसर वॉर रूममध्ये चार वेळा फोन केल्यावर त्यास प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले आहे. या वॉर रूममध्ये नागरिकांच्या तक्रारींना दाद दिली जात नाही, हे खरे ठरल्याचे महापौरांनी सांगितले. मी महापौर असूनही तुम्ही मला अशी वागणूक देत असाल तर सर्व सामान्यांना काय वागणूक देत असाल याची कल्पना येते. मुंबईकर खूप त्रस्त आहेत. त्यांना अधिक त्रास देऊ नका. त्यांना सर्व सुविधा नीट मिळाल्याच पाहिजे, या शब्दात महापौरांनी तेथील कर्मचा-य़ांना सुनावले.त्यामुळे संबंधित कर्मचा-यांची बोलतीच बंद झाली

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -