घरCORONA UPDATEमुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता; राजेश टोपेंनी दिले संकेत

Subscribe

मुंबईसारख्या शहरात कोरोना विषाणूचा प्रसार थांबवणे एक जटिल कार्य आहे. त्यामुळे लॉकडाऊनची कालावधी अजून वाढवावा लागेल असं मला वाटतं, असं टोपे म्हणाले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलला संपणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या देशव्यापी लॉकडाऊन महाराष्ट्र सरकार १४ एप्रिल रोजी संपवणार नाही आहे. सरकार लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढविण्याची शक्यता आहे. विशेषत: मुंबई आणि राज्यातील इतर शहरी भागात वाढवणार आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. आम्ही १५ एप्रिलपर्यंत कोविड-१९ प्रकरणांमध्ये घट होण्याची अपेक्षा करत आहोत. आम्हाला लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही आठवडे वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या शहरात लॉकडाऊन संपवणं शक्य नाही, ”असे टोपे म्हणाले.


हेही वाचा – सामाजिक अंतर गरचेचं; श्वासोच्छवासाद्वारे होतो कोरोनाचा प्रसार

- Advertisement -

“देशभरात लॉकडाऊनची घोषणा होण्याच्या दोन दिवस आधी आम्ही महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू केले होते. त्याआधीही आम्ही शहरी भागात निर्बंध लादले होते आणि सार्वजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरात कोरोना विषाणूचा प्रसार थांबवणे एक जटिल कार्य आहे. लॉकडाऊन संपविण्याचा निर्णय सावधगिरीने व योग्य विचार-विनिमयानंतर घ्यावा लागेल. लॉकडाऊनचा कालावधी अजून वाढवावा लागेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं,” असं टोपे म्हणाले.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत गुरुवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान मोदींनी लॉकडाऊन उचलण्याचे संकेत दिले होते. लॉकडाऊन मागे घेण्याबाबत त्यांनी राज्य सरकारला आपला आराखडा तयार करावा आणि सूचना केंद्राकडे सादर करण्यास सांगितले. राज्य सरकारमधील ज्येष्ठ नेत्यांना मात्र २१ दिवस पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब निर्बंध हटविणे धोकादायक ठरू शकतं असं वाटतं. दरम्यान, टोपे म्हणाले की, मुंबईतील विषाणूचा प्रादुर्भाव कमी करणं हे मोठं काम आहे. परंतु आम्ही कोणतीही कसर सोडत नाही आहोत. आमचे आरोग्य कर्मचारी, पोलिस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी क्लस्टर कंटेन्टमेंट अ‍ॅक्शन प्लॅनवर काम करत आहेत. त्यात मुंबईत २ टीम कार्यरत आहेत. आमच्याकडे संशयीतांचा शोध घेण्यासाठी ८०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात निजामुद्दीनमध्ये आयोजित तबलीग जमात कार्यक्रमामुळे संशयित प्रकरणांची संख्या वाढली आहे. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही हे करू शकू, असं राजेश टोपे म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – गहू आणायला बाहेर पडला म्हणून पोलिसांनी मारलं; कामगाराने केली आत्महत्या


उत्पादन क्षेत्रातील आवश्यक क्षेत्रांना सहाय्य देणाऱ्या सहाय्यक क्षेत्रांना लॉकडाऊनमधून सवलत देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. आवश्यक वस्तूंच्या पॅकेजिंगसाठी आवश्यक असलेल्या पॉलिथीन किंवा रसायनांच्या उत्पादनात काम करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला लॉकडाउनमधून सूट मिळण्याची शक्यता आहे. आम्हाला दिलेल्या निवेदनानुसार त्यांना लॉकडाऊनमधून सूट मिळण्याची शक्यता आहे, ” असं राज्य शासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -