PFI विरोधात महाराष्ट्रात मोठी कारवाई; सचिवासह दोन सदस्यांना पनवेलमधून अटक

mumbai maharashtra ats big action panvel secretary and two members arrested

भारतविरोधी कारवाई करणाऱ्या पीएफआय (Popular Front of India) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रात यासंदर्भात एक कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने पीएफआयचे सचिव आणि अन्य दोन सदस्यांना पनवेलमधून अटक केली आहे. भारतात बंदी असतानाही पीएफआयचे काही कार्यकर्ते आपली संघटना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी पीएफआयच्या एक्स्टेंशन टीमशी संबंधित असल्याचा आरोप आहे.

पनवेलमध्ये पीएफआय सदस्यांची बैठक झाल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती, त्यानंतर एटीएसने ही कारवाई केली. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई करत मुंबईतून एका दहशतवाद्याला अटक केली होती. चरत सिंग उर्फ ​इंद्रजीत सिंग असे या दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी कॅनडास्थित वॉन्टेड गुन्हेगार लखबीर सिंग लांडा याच्या संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले आहे. याने 9 मे रोजी पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला केला. त्याचे वय 30 वर्षे असून ते मूळचे पंजाबचे असल्याचे सांगण्यात आले.

महाराष्ट्र एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, चरत सिंगवर आठ गुन्हे दाखल आहेत. पंजाबमधील कपूरथला तुरुंगातून मार्च 2022 मध्ये तो पॅरोलवर बाहेर आला होता. पॅरोलच्या कालावधीतही त्याने त्याच्या साथीदारांसह 9 मे 2022 रोजी पंजाब पोलिस, मोहाली येथील गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने हल्ला केला.


भारतविरोधात वक्तव्य करणं ब्रिटिश गृहमंत्र्यांना पडले भारी, खुर्चीवरून व्हावे लागले पायउतार