घरताज्या घडामोडीLive Update : अशोक टेकवडे जे.पी.नड्डांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश

Live Update : अशोक टेकवडे जे.पी.नड्डांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश

Subscribe

अशोक टेकवडे जे.पी.नड्डांच्या उपस्थितीत करणार भाजपात प्रवेश

टेकवडेंच्या प्रवेशाने पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार

- Advertisement -

हवाई दलातील अधिकारी देखील पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये

एटीएसच्या तपासात माहिती उघड

- Advertisement -

निखिल शेंडे असे अधिकाऱ्याचे नाव


ठाण्यात स्लॅब कोसळल्याने आईसह दोन मुले जखमी

शहरातील नौपाडा, भास्कर कॉलनी येथील अमर टॉवर या २५ वर्ष जुनी असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कोसळला स्लॅब


गौतमी पाटीलवर बार्शी पोलिसांत तक्रार दाखल

अवांतर पैसे घेतल्याचा गौतमीवर आरोप


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईत दाखल


खडकवास धरण क्षेत्रात बुडून मृत्यू झालेल्या मुलींना सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्रात लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुका लागण्याची शक्यता – अजित पवार

एकत्र निवडणुका लागल्यास धावपळ नको म्हणून महाविकास आघाडीची तयारी सुरु – अजित पवार

जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरवण्यासाठी समिती स्थापन करणार. समितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य असतील – अजित पवार


राज ठाकरेंचा डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद


जे. पी. नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर


पुण्यातील खडकवास धरणात २ मुलींचा बुडून मृत्यू


त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न, प्रशासनाचा आरोप

त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांचा बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न. सुरक्षा रक्षकांनी जमावाला रोखलं.

पोलिसांच्या, मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला.

जमावावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी देवस्थानचं पोलिसांना पत्र.


विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती शरद पवारांच्या भेटीला


मुंबई महापालिका रुग्णालयातील परिचालकांचे आंदोलन


17 मे रोजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक

शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालयात बैठक

आगामी काळातील निवडणुकांबाबत रणनितीची चर्चा करण्याची शक्यता


मुंबईतील खारदांडा कोळीवाड्यात भीषण आग

गॅस गळतीमुळे आग लागल्याची माहिती

आगीत सहा जण जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ईडीचा दुसरा समन्स


ठाकरे गटाचे आमदार विधानसभा सचिव राजेंद्र भागवतांची भेट घेणार

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत पत्र देणार


अहमदनगरमधील राड्याप्रकरणी 30 जण पोलिसांच्या ताब्यात


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्यावरून मुंबईला जाताना एका प्रवासी कारचा अपघात

या अपघातात एक प्रवासी ठार

अपघातग्रस्त गाडीतून पाच जणांचे कुटुंब प्रवास करत असताना अज्ञात वाहनाला मागून धडक दिल्यामुळे अपघात झाला

यात एक ठार तर अन्य चार जण किरकोळ जखमी झाले,

घटनास्थळी महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत

या अपघातामुळे वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही


एअर इंडियाची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा 20 मेपासून होणार सुरु

नागपूर – मुंबई विमानसेवा 20 मेपासून सुरू होणार असून 28 ऑक्टोबरपर्यंत राहील

एअर इंडियाचे एआय-1613 हे विमान20 मे रोजी सकाळी 11 वाजता मुंबईहून उड्डाण भरून नागपुरात येणार

हेच विमान एआय-1614 बनून नागपुरातून दुपारी 12 : 5 वाजता मुंबईसाठी उड्डाण भरेल

एअर इंडिया कंपनीने नियमित विमानसेवेऐवजी अतिरिक्त उड्डाण भरण्याचा निर्णय घेतलाय

विमान 20 मे ते 28 ऑक्टोबरपर्यंत उड्डाण भरेल, त्यानंतर ते नियमित म्हणून उड्डाणाची शक्यता आहे

एअर इंडियाच्या या विमानामुळे अन्य विमान कंपन्यांच्या तिकीटदरात घसरण होण्याची शक्यता

एअर इंडियाच्या या अतिरिक्त विमानसेवेमुळे प्रवाशांना दिलासा


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला आज पर्यटकांसाठी राहणार बंद

खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला आज दुपारी 2 पर्यंत राहणार बंद

कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक ही कार्यवाही करण्यात आल्याने पर्यटक मात्र नाराज

खडकवासला धरणाला लागून असलेल्या उन्नत प्राद्योगिक संरक्षण संस्था (डीआयएटी) येथे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येणार

सुरक्षेच्या कारणास्तव व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौऱ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून खडकवासला चौपाटी आणि सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज पुणे दौरा

पुणे शहरासह पिंपरी चिंचवडमधील विविध कार्यक्रमांना देवेंद्र फडणवीस लावणार हजेरी

पुणे महानगरपालिकेच्या अनेक विकास कामांचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

देवेंद्र फडणवीस शहर भाजप पदाधिकाऱ्यांना देखील करणार संबोधित

18 मे रोजी पुण्यात पार पडणार आहे भाजपा कार्यकारणीची बैठक

तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दौरा हा महत्त्वाचा मानला जात आहे


नगरमधील शेवगावात दोन गटात तुफान दगडफेक

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -