घरताज्या घडामोडीमालाडमधील 'त्या' उद्यानाचे नाव बदलले, शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दे धक्का

मालाडमधील ‘त्या’ उद्यानाचे नाव बदलले, शिंदे-फडणवीस सरकारचा मविआला दे धक्का

Subscribe

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीला अनेक धक्के दिले जात आहे. अशातच आणखी एक धक्का शिंदे-फडणवीस सरकारने मविआला धक्का दिला आहे.

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीला अनेक धक्के दिले जात आहे. अशातच आणखी एक धक्का शिंदे-फडणवीस सरकारने मविआला धक्का दिला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाडमधील उद्यानाला देण्यात आलेले टिपू सुलतानचे नाव बदलण्यात आले आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याबाबत ट्वीट करत घोषणा केली आहे. (mumbai maharashtra tipu sultan name will be removed from malad park by mangal prabhat lodha named during mva uddhav government)

गतवर्षी उद्यानाला टिपू सुलतानचे नाव दिल्याने महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात मोठा वाद रंगला होता. त्यावेळी भाजपाकडून मोठे आंदोलन करण्यात आले होते. या नावावरून खूप गदोरोळ झाला होता. मात्र, आता या उद्यानाला देण्यात आलेले टिपूसुलतानचे नाव बदलण्यात आले आहे. याबाबत मंगलप्रभात लोढा यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

- Advertisement -

मंगल प्रभात लोढा यांचे ट्वीट काय?

“अखेर आंदोलन यशस्वी…गेल्यावर्षी मविआ सरकार विरोधात सकल हिंदू समाजाने केलेले आंदोलन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार गोपाळ शेट्टीजी यांची मागणी लक्षात घेऊन, मविआ सरकारच्या काळात मालाड मधील उद्यानाला दिलेले टिपू सुलतानचे नाव, जिल्हाधिकारी कार्यालयास आदेश देऊन आम्ही हटवले”, असे मंगल प्रभात लोढा यांनी ट्वीट करत सांगितले.

- Advertisement -

नेमक प्रकरण काय?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना मालाडमधील उद्यानाला टिपूसुलतानचे नाव देण्यात आले होते. त्यावेळी टिपूसुलतानचे नाव दिल्याने भाजपाने आक्षेप घेत आंदोलन केले होते. तसेच शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून आव्हान दिले होते.


हेही वाचा – देशातील टॉप १० मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर; एकनाथ शिंदे कितव्या स्थानावर?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -