Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मे महिन्यातला उकाडा होणार कमी? हवामान विभाग सांगतो...

मे महिन्यातला उकाडा होणार कमी? हवामान विभाग सांगतो…

Subscribe

मे महिन्यात पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात वारा खंडित प्रणालीमुळे पावसाळी वातावरण होते. या पार्श्वभूमीवर कमाल तापमानाचा पारा उतरला होता. येत्या काळात नैऋत्य वाऱ्यांमुळे येणाऱ्या पावासचेही वेध लागायला सुरुवात होईल.

राज्यात सुरु असणाऱ्या उष्णतेच्यालाटेने हाहाकार माजवलेले असताना पवसाचे ढग आले आले आणि एकाककी तापमानात काही अंशांनी घट नोंदवण्यात आली. राज्यात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच अवकाळीचे वातावरण पाहायला मिळाले. तसचं, मे महिन्यात पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात वारा खंडित प्रणालीमुळे पावसाळी वातावरण होते. या पार्श्वभूमीवर कमाल तापमानाचा पारा उतरला होता. येत्या काळात नैऋत्य वाऱ्यांमुळे येणाऱ्या पावासचेही वेध लागायला सुरुवात होईल. त्यामुळे मुंबईचं तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता सध्या कमी जाणावत असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवले आहे.( Mumbai Maharashtra weather Update and Forecast for May across maharashtra latest update )

शुक्रवारी, शनिवारी तापमानाचा पारा सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही केंद्रांवर 32 ते 33 अंशांदरम्यान होता. शनिवारी कुलाबा येथे कमाल तापमान 32.5 तर सांताक्रूझ येथे 32.9 अंश सेल्सिअस होते. दोन्ही केंद्रांवरील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा एका अंशाने कमी होते. शुक्रवारीही कुलाबा येथे 32.2, तर सांताक्रूझ येथे 32.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र, तसे असताना हे तापमान 32 अंशांहून अधिक जाणवल्याचा अनुभव मुंबईकरांनी सांगितला.

- Advertisement -

सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली प्रणाली, तसचं, 15 मेनंतर वाऱ्यांची दिशा बदलण्यास सुरुवात होईल, यामुळे तापमान वाढण्यास खूप वाव मिळणार नाही, अशी शक्यता आहे. यंदा कोकण विभागात उष्णतेच्या लाटा अधिक अनुभवण्यास मिळाल्याने नागरिकांना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत तापमानाचा तडाखा अधिक बसेल, अशी भीती वाटत होती. एकामागून एक निर्माण झालेल्या तीन पश्चिमी प्रकोपांमुळे, तसचं, वारा खंडितता स्थितीमुळे पावसाळी वातावरण निर्माण होऊन कमाल तापमान नियंत्रणात आले आणि मुंबईकरांना दिलासा मिळाला.

( हेही वाचा: “विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न” दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र )

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -