घरमहाराष्ट्रकोण अमृता फडणवीस?, महापौर किशोरी पेडणेकरांचा खोचक टोला

कोण अमृता फडणवीस?, महापौर किशोरी पेडणेकरांचा खोचक टोला

Subscribe

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावर आता मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नावडतीचं मीठ अळणी असं म्हणत कोण अमृता फडणवीस? असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे.

अमृता फडणवीस यांनी पुण्यात एका कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. महाविकास आघाडीतल्या नेत्यांमध्ये एकमेकांची पाठ खाजवणं सुरु आहे, अशी टीका अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली. यावर किशोर पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कोण अमृता फडणवीस? अशा बऱ्याच अमृता फडणवीस आहेत, असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

- Advertisement -

राज्यपालांसारखा माणूस मी पाहिला नाही – अमृता फडणवीस

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नांदेड दौऱ्याला सरकारकडून विरोध होत असल्याच्या मुद्द्यावरही अमृता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालांसारखा कर्तृत्ववान, निष्ठावान माणूस मी पाहिलेला नाही. जे विरोध करत आहेत, त्यांचा राजकीय अंतर्गत मुद्दा असून, त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या नसतील. हा त्यांच्या मनात राग असेल, त्याबद्दल मला माहिती नाही. पण असं व्हायला नको, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -