Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नागरिकांच्या बेफिकिरीपणामुळे रुग्ण संख्येत वाढ, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आय़ुक्तांचा दावा

नागरिकांच्या बेफिकिरीपणामुळे रुग्ण संख्येत वाढ, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आय़ुक्तांचा दावा

Related Story

- Advertisement -

मुंबईत कोरोना आटोक्यात आलेला असताना पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होण्यास केवळ रेल्वे सेवा कारणीभूत नाही. नागरिकांचा बेफिकिरीपणा कारणीभूत आहे. विशेषतः उच्चभ्रू लोक वस्तीत सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येत काहीशी वाढ होत आहे, असे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे. सरकार व पालिकेने कोरोना नियंत्रणात आल्यानंतर १ फेब्रुवारीपासून रेल्वे लोकल सेवा सर्वसामन्यांसाठी सुरू केली. मात्र रेल्वे सेवा सुरू केल्यानंतर रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात असले तरी ते खरे कारण नाही. नागरिक कोरोनाबाबतच्या नियमांचे म्हणजेच तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे आणि सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचे पालन करीत नसल्याने आणि त्यांच्या बेफिकिरीपणामुळेच रुग्ण संख्येत काहीशी वाढ झाल्याचे सुरेश काकाणी यांनी म्हटले आहे.

सर्व प्रकाराची गंभीर दखल पालिकेने व सरकारने घेतली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे.
तसेच, सध्या कोरोनावर वेगळे औषध नाही. लसीकरण हेच औषध आहे. प्रत्येकाने मास्क वापरणे, कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करणे हे खात्रीचे उपाय आहेत, असे काकाणी यांनी सांगितले.

कोरोनाबाधितांमध्ये उच्चभ्रू लोकांची संख्या अधिक

- Advertisement -

सध्या रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली नाही. कारण की, रेल्वे प्रवासाची परवानगी सर्वसामान्यांना दिल्यानंतर ८ लाख प्रवासी संख्या अगोदर होती त्यात अंदाजे १४ लाखाने वाढ झाली आहे. मात्र केवळ रेल्वे सेवा कारणीभूत असती तर सर्वसामान्य नागरिकांची संख्या वाढली असती. तर दुसरीकडे उच्चभ्रू लोकवस्तीमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर २०२० प्रमाणे पुन्हा सुसज्ज

मुंबईत गेल्या मार्चपासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मात्र पालिकेने ज्या पद्धतीने रुग्णालये, जंबो कोविड सेंटर, कोरोना तपासणी, बेड, आयसीयू ,शोध मोहीम , औषधोपचार आदी विविध उपाययोजना राबवल्याने त्याच पद्धतीने आता पुन्हा एकदा तयारी सुरू करण्यात आली आहे. जर रुग्ण संख्या अधिक वाढल्यास तात्काळ उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे काकाणी यांनी सांगितले.

रुग्ण बाधित १८% ; लक्षणे नसलेले ८२%

- Advertisement -

मुंबईत सध्या जे रुग्ण आढळून येत आहेत त्यांची संख्या ही जेमतेम १८% एवढी आहे. तर ८२% लोक लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे काकाणी यांनी म्हटले आहे. मात्र कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे काकाणी यांनी म्हटले आहे.


 

- Advertisement -