घरताज्या घडामोडीआरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्यावरण ऱ्हासाच्या कारणामुळे आरेमधील प्रस्तावित कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्थगितीबाबत मोठा निर्णय घेतला असून मुंबईच्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता कारशेड आरेमध्येच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याचप्रमाणे अडीच वर्ष स्थगित असलेल्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे आरे परिसरात कारशेडच्या कामाला वेगाने सुरूवात होण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पाची धुरा पुन्हा एकदा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली आहे. जवळपास कारशेडचे २५ टक्के काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, आता नवीन वाद निर्माण होण्यापूर्वीच आरेतील मेट्रो कारशेडचे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असणार आहे.

- Advertisement -

राज्यात शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मेट्रो-३ चे कारशेड आरेमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारशेडचे काही काम पूर्णही झाले आहे. मात्र, २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. पर्यावरणाचे नुकसान होणार असल्याचे सांगत त्यांनी आरेऐवजी कारशेड कांजूरमार्गला करण्याचा निर्णय ठाकरेंनी घेतला होता. मात्र, या जागेच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हायकोर्टात गेला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मेट्रो – ३ चे कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयात भूमिका मांडण्याची सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाधिवक्त्यांना दिली आहे. त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -