घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारणार, प्रस्तावित टप्प्यांविषयी फडणवीसांकडून माहिती

मुंबई मेट्रोचे जाळे विस्तारणार, प्रस्तावित टप्प्यांविषयी फडणवीसांकडून माहिती

Subscribe

Maharashtra Assembly Budget 2023 | आतापर्यंत मुंबईत एकूण ४६ किमी मेट्रोचे जाळे खुले झाले असून जवळपास ५० किमीपर्यंत लवकरच खुले करण्यात येणार आहे.

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुंबई मेट्रोचा आणखी विस्तार करणार असल्याचे आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फणडणवीस यांनी घोषित केले. त्यानुसार, आतापर्यंत मुंबईत एकूण ४६ किमी मेट्रोचे जाळे खुले झाले असून जवळपास ५० किमीपर्यंत लवकरच खुले करण्यात येणार आहे.

हेही वाचा मोठी बातमी! ST प्रवासात महिलांना तिकीटदरात सरसकट ५० टक्के सूट

- Advertisement -

मुंबईत आतापर्यंत ३३७ किमी मेट्रो प्रस्तावित आहे. त्यापैकी, ४६ किमी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून यावर्षी ५० किमीचा मार्ग खुला करण्यात येणार आहे. तसंच, मुंबई मेट्रो १० गायमूख ते शिवाजी चौक मीरा रोड हा ९.२ किमीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. यासाठी ४ हजार ४७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, मुंबई मेट्रो ११ वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा १२.७७ किमीचा प्रकल्प प्रस्तावित असून यासाठी ८ हजार ७३९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर, मुंबई मेट्रो १२ कल्याण ते तळोजा या २०.७५ किमीच्या प्रकल्पासाठी ६७०८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

तसंच, नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पाही प्रगतीप्रथावर असून ६७०८ कोटींचा हा प्रकल्प प्रस्तावित आहे. तर, पुणे मेट्रोचा ८३१३ कोटींची कामेही प्रगतीपथावर असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रोचीही कामे प्रस्तावित आहेत.

- Advertisement -

रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण

  • नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
  • सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
  • नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
  • सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
  • 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी

विमानतळांचा विकास…

  • शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
  • छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
  • नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
  • पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
  • बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -