घरताज्या घडामोडीपर्जन्य वाहिनीवरील तुटलेल्या झाकणांकडे मुंबई पालिकेचे दुर्लक्ष; अपघाताला निमंत्रण

पर्जन्य वाहिनीवरील तुटलेल्या झाकणांकडे मुंबई पालिकेचे दुर्लक्ष; अपघाताला निमंत्रण

Subscribe

मुंबई: उच्च न्यायालयाने उघड्या मॅनहोलच्या प्रकरणावरून मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. मात्र तरीही पालिकेचे डोळे उघडत नाहीत. घाटकोपर (प.), सर्वोदय रूग्णालयासमोरील गोळीबार रोडवर निकृष्ट स्वरूपाच्या बांधकामामुळे रस्त्यावरील पर्जन्य जलवाहिन्यांवरील झाकणे दोन ठिकाणी तुटली असून त्याची तात्काळ दुरुस्ती न करता त्याकडे दुर्लक्ष करून अपघाताला निमंत्रण दिले जात आहे. याच रस्त्यावरून दररोज शेकडो लहान – मोठी वाहने, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी ये – जा असते. त्यातच एखादा गंभीर अपघात झाल्यास जिवीत हानी होण्याची अथवा एखादी व्यक्ती, विद्यार्थी गंभीर जखमी होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत २०१७ मध्ये पावसाळ्यात मॅनहोलमध्ये पडून डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये समीर अरोरा हे लोअर परळ येथील फिनिक्स माॅल येथून चालत जात असताना उघड्या मॅनहोलमध्ये पडले. मात्र त्यांच्या सुदैवाने ते कसेबसे त्यामधून बाहेर आले व बचावले होते. मुंबईत अशा अनेक दुर्घटना घडत असतात. मुंबई उच्च न्यायालयाने उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या अपघातांची गंभीर दखल घेऊन मुंबई महापालिकेला चांगलेच झापले.

- Advertisement -

मात्र तरीही पालिकेचे डोळे उघडत नाहीत. वास्तविक, न्यायालयाने झापल्यावर पालिकेने तात्काळ संपूर्ण मुंबईत सर्वेक्षण करून मॅनहोल, पर्जन्य जलवाहिन्यांवरील उघडी झाकणे आदींचा आढावा घ्यायला पाहिजे होता. तसेच, त्या त्या ठिकाणी तात्काळ कार्यवाही, अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने रस्त्यांवरील उघडे मॅनहोल, पर्जन्य जलवाहिन्यांवरील तुटकी झाकणे अपघाताला निमंत्रण दिले जात आहे.

घाटकोपर ( प.), सर्वोदय रूग्णालय समोरील बमणजी वाडी समोर, गोळीबार रोडवर पर्जन्य जलवाहिन्यावरील काही अंतरावर एकामागोमाग असलेली दोन झाकणे तुटली आहेत. ही झाकणे रस्त्यावरच असल्याने त्यावरून दररोज मिनी बस, टेम्पो, कार, रिक्षा आदी वाहनांची सतत ये – जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी पर्जन्य जलवाहिन्यावरील झाकणे काही दिवसात सातत्याने तुटत असतात. त्याबाबत कोणी तक्रार केली तर काही दिवसांनी त्याची दुरुस्ती करण्यात येते. मात्र झाकणे तुटण्याच्या घटना सतत घडत असल्याने कदाचित पालिकेचे दुर्लक्ष होत असावे.

- Advertisement -

त्यामुळे यावेळी दोन ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीवरील तुटलेल्या झाकणांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने व त्याच्या बाजूने लहान – मोठ्या वाहनांची सतत ये-जा सुरू असल्याने वाहन अपघात घडण्याची दाट शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या तुटलेल्या झाकणांच्या ठिकाणी बांबू लावण्यात आले आहेत. याच रस्त्यावरून दररोज शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, तरुण, तरुणी, ज्येष्ठ नागरिक यांची ये – जा असते. ते चुकून त्या तुटलेल्या झाकणांवरून गेल्यास, अथवा त्यामध्ये चुकून पडल्यास सदर विद्यार्थी, व्यक्ती जखमी होण्याची व अपघात त्यांच्या जीवावर बेतण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.


हेही वाचा : अमित शाहांच्या आरोपावर काँग्रेसचा प्रतिसवाल, गंगा अभियानासाठी…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -