Homeमहाराष्ट्रBiometric Face Attendance : 1800 बायोमेट्रिक फेस मशीनद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी

Biometric Face Attendance : 1800 बायोमेट्रिक फेस मशीनद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची हजेरी

Subscribe

मुंबई महापालिकेत बायोमेट्रिक मशीनवर बोट ठेवून हजेरी लावण्याची पद्धती कालबाह्य ठरली आहे. महापालिकेने 'बायोमेट्रिक फेस मशीन' द्वारे हजेरी लावण्याची कार्यपद्धती सुरू केली आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेत बायोमेट्रिक मशीनवर बोट ठेवून हजेरी लावण्याची पद्धती कालबाह्य ठरली आहे. महापालिकेने ‘बायोमेट्रिक फेस मशीन’ द्वारे हजेरी लावण्याची कार्यपद्धती सुरू केली आहे. सध्या महापालिकेच्या मुख्यालय आणि विविध विभाग कार्यालयात या बायोमेट्रिक फेस मशीन बसवल्या आहेत. मात्र 1 जानेवारी 2025 पासून सर्वच पालिका कार्यालयात बायोमेट्रिक फेस मशीनद्वारे हजेरी लावावी लागणार आहे.

आणखीन 300 ते 400 मशीन ठिकठिकाणी बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अगोदरच्या बायोमेट्रिक मशीनमधील त्रुटींचा गैरफायदा उठवणाऱ्यांना चाप बसणार आहे. काही कालावधीपूर्वी महापालिकेच्या एका विभाग कार्यालयाच्या ठिकाणी नकली बोटाच्या वापराद्वारे हजेरी लावण्यात आल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले होते. त्यामुळेच महापालिका प्रशासनाने अशा पद्धतीने बायोमेट्रिक हजेरीचा वापर करणाऱ्यांना कायमचा चाप लावण्यासाठी ‘बायोमेट्रिक फेस मशीन’चा पर्याय शोधून काढला आहे. त्यामुळे आता सदर मशीनच्याद्वारे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्या चेहऱ्याचा फोटो दररोज हजेरी स्वरूपात नोंदवला जात आहे. त्यामुळे आता बोगस हजेरी लावण्याच्या घटना घडणार नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा – Mumbai Accident : भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले; तिघांचा मृत्यू तर 17 गंभीर

वास्तविक, बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावण्याच्या एकूणच प्रकाराला प्रारंभी महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी, कामगार संघटनांनी विरोध दर्शवला होता. मात्र महापालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नाईलाजाने महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना बायोमेट्रिक हजेरी लावणे भाग पडले. मात्र या कार्यपद्धतीत सुद्धा नकली हजेरी प्रकरण उघडकीस आल्याने पालिका प्रशासनाने अखेर रामबाण तोडगा काढला. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना बायोमेट्रिक फेस मशीनद्वारे हजेरी लावणे आता बंधनकारक झाले आहे. त्यामुळे दांडी बहाद्दर कर्मचारी, नकली हजेरी लावण्याचा प्रयत्न करणारे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. सदर मशीनवर बायोमेट्रिक फेस मशीनद्वारे हजेरी न लागल्यास त्या कर्मचाऱ्याची त्या दिवशी गैरहजेरी लागणार असून त्या दिवसाचा पगार सुद्धा कापण्यात येणार आहे.

- Advertisement -

100 कर्मचाऱ्यांच्या मागे एक मशीन

दरम्यान, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची सध्याची अंदाजित संख्या 91 हजार एवढी आहे. किमान 100 कर्मचाऱ्यांच्या मागे एक मशीन याप्रमाणे मशीन बसवण्यात आल्या आहेत. आणखीन 300 ते 400 मशीन बसविण्यात येणार आहेत. या एका बायोमेट्रिक फेस मशीनची किंमत 35 हजार रुपये आहे. पालिकेने 1800 मशीन लावल्या आहेत.

हेही वाचा – Rahul Narwekar : सर्वांना सभागृहाची शिस्त पाळावी लागेल! नार्वेकरांनी सत्ताधारी, विरोधकांचे कान टोचले


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -