घरताज्या घडामोडीमुंबईकरांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकाचे पुढाकार, १ कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर

मुंबईकरांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकाचे पुढाकार, १ कोटी डोससाठी ग्लोबल टेंडर

Subscribe

ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ३ आठवड्यात लसींचा पुरवठा होण्याची शक्यता

मुंबईत कोरोना लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात लसींच्या डोसची गरज आहे. परंतु लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईती अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात येत आहेत. कोरोना लसींचा तुटवडा असल्यामुळे मुंबई महानगरपालिका लसीकरण गतीने करु शकत नाही आहे. या सगळ्यावर तोडगा काढत आता मुंबई महानगरपालिकेने १ कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. या ग्लोबल टेंडरमुळे मुंबई महानगरपालिका लसीकरण वेगाने पुर्ण करु शकेल यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळेल तर मोठ्या कंपन्याही या टेंडरमध्ये सहभागी होतील.

मुंबई महापालिकेने पुढाकार घेऊन ग्लोबल टेंडर काढले आहे. लस पुरवठा करणाऱ्या कंपन्या १२ ते १८ मे दरम्यान ग्लोबल टेंडर भरु शकणार आहेत. १८ मेला लसींच्या पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना शेवटचा दिवस आहे. ऑर्डर दिल्यानंतर अवघ्या ३ आठवड्यात लसींचा पुरवठा होण्याची शक्यता आहे. परंतु ग्लोबल टेंडर भरणाऱ्या कोविड लस पुरवठादार कंपनीला डिसीजीआय आणि आयसीएमआरचे नियमांचे पालन करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये भारताच्या सीमेला लागून असणाऱ्या देशांतील कंपन्यांना टेंडर भरता येणार नाही.

- Advertisement -

भाजपच्या शिष्ट मंडळाने केली होती मागणी

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांच्या विषयावर महानगरपालिका आयुक्तांची भेट मागितली होती. परंतु आयुक्त भेट नाकारात होते. मुंबईकरांसाठी मोफत लस मिळाली पाहिजे. १८ ते ४४ वयोगटासाठी लागणारे लसीचे डोस खरेदी करण्यासाठी एकरक्कमी चेक तयार आहे. मोफत लस द्यायची जबाबदारी आमची असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. उपलब्ध लसीतून लसीकरण वेळेत होणार नाही. केंद्रातून ४५ वर्षांसाठी येणारी लस दुसऱ्या डोससाठी वापरण्यात यावी, मुंबई महापालिकेने स्वतंत्र ग्लोबल टेंडर काडून स्वतःच्या पैशाना लस घ्यावी अशी मागणी भाजपच्या शिष्ट मंडळाने केली होती.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -