घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका निवडणूक; आरक्षणाबाबत ३९९ हरकती आणि सूचना

मुंबई महापालिका निवडणूक; आरक्षणाबाबत ३९९ हरकती आणि सूचना

Subscribe

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २९ जुलै रोजी नव्याने काढण्यात आलेल्या सर्वसाधारण महिला, ओबीसी आरक्षणाबाबत ३० जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आदींकडून ३९९ हरकती व सूचना मुंबई महापालिका निवडणूक विभागाकडे नोंदविण्यात आल्या आहेत.

या हरकती व सूचना यांवर सुनावणी न घेता पालिका प्रशासन योग्य तो निर्णय घेईन. त्यानंतर त्याबाबतचा अंतिम अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्यावर त्यास राजपत्रात प्रसिद्धी देण्यात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२२’ करिता २३६ प्रभागांपैकी निर्धारित जागांसाठीचे ‘आरक्षण निश्चिती’ व सोडत नुकतीच काढण्यात आली.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांन्वये व त्यानुसार निवडणूक आयोगाच्या सुधारित मार्गदर्शक सुचनांनुसार नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर हरकती सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार २ ऑगस्टपर्यंत ३९९ सूचना हरकती प्राप्त झाल्या आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.


हेही वाचा : १०-१२ कि.मी. पायपीट करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना सफाई कामगार परिवर्तन संघातर्फे सायकलची भेट

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -