मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार, NHAIची हायकोर्टात हमी

Mumbai-Nashik highway to be free of potholes by October 25, NHAI say High Court
मुंबई-नाशिक महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त करणार, NHAIची हायकोर्टात हमी

मुंबई- नाशिक महामार्गावरील (Mumbai-Nashik highway)खड्डे बुजवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोमवारी उच्च न्यायालयात मुंबई – नाशिक राष्ट्रीय महामार्ग २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डेमुक्त केला जाईल,अशी हमी दिली आहे. (Mumbai-Nashik highway to be free of potholes by October 25, NHAI say High Court)  राज्यात मुसळधार पाऊस झाला नाही तर ठाणे ते नाशिक या १२१ किलोमीटर महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम २४ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचा मान असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायलयात सांगितले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूकीत अनेक अडचणी येत होत्या. राज्य सरकारने देखील या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याच्या सुचना देत तात्काळ खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयात दिलेल्या हमीनुसार २५ ऑक्टोबरपर्यंत खड्डे बुजणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. २५ ऑक्टोबरला या प्रकरणाची सुनावणी होणार असून महामार्गावरील कामांच्या प्रगतीचा अहवाल सादर केले जाणार आहेत.

मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सुओ मोटो याचिका दाखल करुन घेतली होती. न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी मुंबई नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवण्याची जबाबदारी आमची असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले.

येत्या काळात मुसळधार पाऊस झाला नाही तर खड्डे बुजवण्याच्या कामाला चांगलाच वेग येईल आणि हे काम पूर्ण होईल. पाऊस झाला नाही तर ठाणे ते वडपे या पट्ट्यातील खड्डे ५ ऑक्टोबर बुजवण्याचे काम पूर्ण होईल तर वडपे ते नाशिक या ९६ किलोमीटर पट्ट्यातील खड्डे २४ ऑक्टोबरपर्यंत बुजवण्याचे काम पूर्ण होईल,असे अनिल सिंह यांनी सोमवारी उच्च न्यायालयात म्हटले.


हेही वाचा – नागपूरपाठोपाठ नाशिकमध्येही डबलडेकर उड्डाणपूल, त्यावर धावणार मेट्रो