घरदेश-विदेशड्रग्ज रॅकेट : परदेशातून मुंबईत ड्रग्ज पुरवठ्याचा लागला छडा

ड्रग्ज रॅकेट : परदेशातून मुंबईत ड्रग्ज पुरवठ्याचा लागला छडा

Subscribe

अभिनेता अरमान कोहलीच्या अटकेनंतर NCB च्या हाती लागले होते धागेदोरे, इंटरनॅशनल ड्रग्ज कनेक्शन उघड

मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ने मुंबईतील परदेशी कोकीन पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. विशेष म्हणजे यातून हे अंमलीपदार्थ जेथून आणले जातात, त्या दोन मार्गांचीही माहिती उघडकीस आलीय.

ड्रग्ज प्रकरणात NCB ने अभिनेता अरमान कोहली याला अटक केल्यानंतर त्याच्या घरातून दक्षिण अमेरिकन कोकेन जप्त करण्यात आले होते. याचवेळी या संपूर्ण प्रकारामागे आंतरराष्ट्रीय माफिया टोळीचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते.

- Advertisement -

हे आहेत तस्करीचे मार्ग

या प्रकरणाच्या तपासात कोलंबिया- पेरू- साऊथ आफ्रीका आणि तेथून मुंबई असा एक मार्ग एनसीबीच्या तपासात उघडकीस आला. कोलंबिया देश उच्च दर्जाच्या कोकेनचं केंद्र मानला जातो. तिथूनच ड्रग्ज पेरूच्या मार्गेने साऊश आफ्रिकेत पोहोचते आणि नंतर विदेशी ड्रग्ज पेडलर वेगवेगळ्या पद्धतीने हे ड्रग्ज मुंबईत आणतात. अरमान कोहलीच्या प्रकरणात हाय प्रोफाइल ड्रग्ज पेडलर अजय राजू सिंह उर्फ मामू हे काम करत होता. NCB ने अशाच एका प्रकरणात एका विदेशी ड्रग्स पेडलरच्या पोटातून १० कोटींचं कोकेन जप्त केलं होतं. दरम्यान, ड्रग्ज तस्करीचा दुसरा मार्ग कोलंबिया- इथोपिया-ब्राझिल-दिल्ली और मुंबई असा आहे. याच मार्गाचा वापर अज राजू सिंह आणि त्याचे विदेशी साथीदार वारंवार मुंबईत कोकेन पुरवण्यासाठी करत होते.

NCB च्या माहितीनुसार, मुंबईत ड्रग्ज आणल्यानंतर अजय राजू सिंह आपल्या वेगवेगळ्या ड्रग्स पेडलर्सच्या माध्यमातून हे कोकेण अरमान कोहलीसह बॉलीवूड और टीव्ही क्षेत्रातशी संबंधित व्यक्तींना पुरवत होता. वरील दोन्ही मार्गांच्या माध्यमातून ड्रग्ज आणत गेल्या पाच वर्षांत कोट्यवधींच्या अंमली पदार्थांचा पुरवठा अजय राजू सिंहने केलाय. गेल्या २८ ऑगस्टला NCB ने अजय राजू सिंहला हाजी अली येथून अटक केली होती. त्यानेच तपासात अरमान कोहलीचं नाव घेतलं होतं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -