घरताज्या घडामोडीMumbai Pod Hotel: IRCTC ने लॉंच केलं पहिलं पॉड हॉटेल, कमी किमतीत...

Mumbai Pod Hotel: IRCTC ने लॉंच केलं पहिलं पॉड हॉटेल, कमी किमतीत अधिक सुविधा

Subscribe

पॉड हॉटेलमध्ये प्रवाश्यांना अनेक सुविधा मिळणार...

मुंबई : आयआरसीटीसीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्ट्रेशनवर पहिलं पॉड हॉटेल लाँच केलं आहे. भारतीय रेल्वेमध्ये प्रवाश्यांच्या पसंतीनुसार सुविधा देण्यात आल्या आहेत. ही सुविधा भारतात रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी एक गेमचेंजर आहे. जे प्रवाशी कामानिमित्त बाहेर जाणार आहेत. त्यांच्यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे. कारण कमी किमतीत तुम्हाला अधिकाधिक सुविधा येथे मिळणार आहेत. जर मुंबईमध्ये तुम्ही राहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी गेलात. तर हे पॉड हॉटेल तुमच्यासाठी उत्तम स्थान आहे. या हॉटेलमध्ये इंटरनेटच्या सुविधांपासून ते एसी रूमपर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच येथील भाडे सुद्धा अगदी कमी आहे.

मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेलला लाँन्च करण्यात आलंय. जर कोणताही प्रवासी ट्रेनमधून प्रवास करताना कंटाळला असेल. तर तो व्यक्ती किंवा प्रवासी त्या हॉटेलमध्ये राहू शकतो. या हॉटेलमध्ये प्रवासी पाहुणे किंवा मंडळी १२ ते २४ तासांपर्यंत राहू शकतात. येथे थांबण्याचं भाडं ९९९ रूपयांपासून ते १९९९ रूपयांपर्यंत आहे. तसेच खासगी पॉडचं भाडं १२४९ रूपयांपासून ते २४९९ रूपयांपर्यंत आहे.

- Advertisement -

अशा असतील सुविधा ?

पॉड हॉटेलमध्ये पाहुण्यांना किंवा प्रवाश्यांना अनेक सुविधा मिळणार आहे. येथे फ्री वायफायची सुविधा असणार आहे. त्याशिवाय क्लिन वॉशरूम, लगेज रूम, शॉवर रूम आणि कॉमन एरिया अशा प्रकारच्या सुविधा असणार आहेत. याशिवाय टिव्ही आणि चार्जिंग प्वॉईंट देखील असणार आहेत. तसेच रिडींग लाईटची सुद्धा व्यवस्था असणार आहे.

पॉड डिझाईनचं रिटायरिंग रूम भारतीय रेल्वेसाठी पहिलं रिटायरिंग रूम असणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच बाहेरील प्रवाश्यांना आता मुंबई सेंट्रल हॉटेलमध्ये एक नवीन सुविधा मिळणार असून त्याचा अनुभव देखील घेता येणार आहे. हॉस्पिटलच्या सेवेसाठी मॅसर्सच्या आधारावर पॉड हॉटेल सोपावण्यात आलंय. जी भारतात या तंत्रज्ञान किंवा सेवेला आणण्यासाठी पहिलीच कंपनी आहे.

- Advertisement -

हेही वाचा: Powai Fire : पवईतील साई ह्युंडाई कंपनीच्या सर्विस सेंटरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल


IRCTCने ओपन टेंडरच्या माध्यमातून ९ वर्षांसाठी पॉड कॉन्सेप्टची स्थापना केली आहे. तसेच या हॉटेलला अजून तीन वर्षांसाठी वाढवलं जाऊ शकतं. पॉडची सुविधा मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आहे. तसेच जवळपास ३००० फूट क्षेत्रामध्ये हे हॉटेल पसरलं आहे. त्यामुळे थकलेल्या आणि कमी पैशात जास्त सुविधा या हॉटेलमध्ये सर्व प्रवाश्यांना घेता येणार आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -