रील्स बनवून व्हायचं होतं दाऊद, पण पोलिसांनी ठोकल्या बेड्या; वाचा नेमके प्रकरण काय?

शुक्रवारी एका मस्तान कंपनी गँगच्या तडीपार गुंडाने तलवार घेऊन एक रील बनवला. त्यामुळे अंधेरी मरोळ परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला. या गुंडाला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारखी आपली मस्तान टोळी तयार करायची होती. मात्र, पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे.

सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह रील्सवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. एखाद्या रील्समध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर, संबंधितावर अटकेची कारवाई केली जाते. असे असले तरी, सोशल मीडियावर रील्सवरून मुंबई पोलिसांना चॅलेंज करणाऱ्या एका तडीपार गुंडाच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शहादा सलीम मुल्ला उर्फ पद्या (23) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. (mumbai police arrested criminal who challenge to arresting at his residential area)

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एका मस्तान कंपनी गँगच्या तडीपार गुंडाने तलवार घेऊन एक रील बनवला. त्यामुळे अंधेरी मरोळ परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला. या गुंडाला कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसारखी आपली मस्तान टोळी तयार करायची होती. मात्र, पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. विशेष म्हणजे आधीच्या गुन्ह्यात असलेली तडीपारीची शिक्षा संपण्याआधीच हा गुंड पुन्हा मुंबईत दाखल झाला होता.

अंधेरी पूर्वेकडील मरोळ एमआयडीसी परिसरातील अहमद दाऊत चाळीत राहणाऱ्या शहादा सलीम मुल्ला उर्फ पद्या याच्यावर 15 पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये चोरी, घरफोडी, तलवार घेऊन दहशत निर्माण करणे सारखा गुन्ह्यांची नोंद आहे.

हातात तलवार घेऊन एक रील बनवून पुन्हा पोलिसांना आव्हान देऊ लागला. हा व्हिडीओ व्हायरलही झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. खबऱ्याकडून एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी त्याला रात्री ताब्यात घेतले.


हेही वाचा – मुंबईची जलवाहिनी ठाण्यात फुटली; लाखो लिटर पाणी वाया, ‘या’ भागांमध्ये पाणी कपात