घरमहाराष्ट्रPolice Recruitment : पोलीस भरतीतील धावण्याच्या शर्यतीतही चिटिंग, १६ उमेदवारांविरोधात गुन्हे

Police Recruitment : पोलीस भरतीतील धावण्याच्या शर्यतीतही चिटिंग, १६ उमेदवारांविरोधात गुन्हे

Subscribe

मैदानी चाचणीतील धावणे या प्रकाराची चाचणी यंदा डिजीटल पद्धतीने तपासली जात आहे. पण यातही पळवाट शोधण्यात काही उमेदवार यशस्वी झाले.

आरोग्य विभाग, म्हाडा, शिक्षण विभागातील पेपरफुटीची प्रकरणं आतापर्यंत तुम्ही वाचली असतील. तसंच परिक्षेत एका परिक्षार्थीच्या नावावर दुसऱ्यानेच पेपर सोडवल्याचे प्रकारही तुम्ही घडलेले पाहिले असतील. आता तर मुंबई पोलीस भरतीच्या धावण्याच्या शर्यतीत घोळ झाल्याची घटना समोर आली आहे. धावण्याची शर्यतीत आपली नोंदली गेलेली वेळ अचूक यावी यासाठी काही उमेदवारांनी अनोखी शक्कल वापरल्याचं समोर आलंय. या प्रकरणात जवळपास १६ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई पोलिसांच्या वतीने पोलीस भरती-२०१९ची प्रक्रिया सध्या सुरू आहे. सांताक्रूझ इथल्या मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील मैदानावर पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी घेण्यात आली. एकूण ७ हजार ७६ शिपाई पदासाठी जवळपास ५ लाख ८१ उमेदवार या पोलीस भरतीच्या परिक्षेसाठी आपले नशीब आजमावणार आहेत. यंदाची ही भरती प्रक्रिया आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून पार पडत आहे. मात्र या आधुनिक यंत्रणेलाही मागे टाकत काही उमेदवारांनी पळवाट शोधून काढलीच. या भरतीच्या धावण्याच्या शर्यतीत आपली वेळ योग्य यावी, यासाठी काही उमेदवारांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली. हा गैरप्रकार वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

- Advertisement -

मैदानी चाचणीतील धावणे या प्रकाराची चाचणी यंदा डिजीटल पद्धतीने तपासली जात आहे. त्यासाठी उमेदवाराच्या पायाला एक चिप बसवली जाते, जी धावण्याचा रेकॉर्ड ठेवते. या चिपची अदलाबदल करीत असल्याचे समोर आल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरूवातीला आठ जणांविरुद्ध पवई पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटजद्वारे पाहणी केली असता सीसीटीव्हीत उमेदवार पोहोचलेली वेळ आणि प्रत्यक्षात त्यांच्या चीपमध्ये नोंदली गेलेली वेळ या दोन्ही वेगवेगळ्या असल्याच्या दिसून आल्या. अशा घोळ झालेल्या उमेदवारांची चौकशी केली असता आणखी सहा जणांनी असाच गैरप्रकार केल्याचं दिसून आलं. या सहाही उमेदवारांवर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणात दाखल गुन्ह्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

हे ही वाचा : कॅनडात खलिस्तानींचा धुमाकूळ, आणखी एका गांधी पुतळ्याची विटंबना, भारतीयांमध्ये रोष

अशी केली होती चिटिंग

  • या चाचणीमध्ये उमेदवाराच्या पायाला एक चिप बसवली जाते, जी धावण्याचा रेकॉर्ड ठेवते. दोन्ही चीपचा क्रमांक आणि उमेदवाराचा क्रमांक यांची नोंद घेतली जाते.
  • ही प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे रेकॉर्ड होते. कुणी किती पळालं अन् तेही किती मिनीटांत याची अचूक माहिती उमेदवारांच्या दोन्ही पायांवर लावलेली चिप लगेच सांगते.
  • पण यातही पळवाट शोधण्यात काही उमेदवार यशस्वी झाले. दोन्ही चीपचा क्रमांक आणि उमेदवाराचा क्रमांक यांची नोंद केली जाते.
  • धावण्याची शर्यत सुरू होण्याआधी एकमेकांना ओळखत असलेले उमेदवार दोन पैकी एका चीपची अदलाबदल करत होते.
  • दोघांपैकी एक कुणीतरी आधी पोहोचतो तेव्हा या चिपमध्ये त्याच्या स्वतःची योग्य वेळ नोंदवली जातेच. पण दुसऱ्या पायात आणखी एका दुसऱ्याची चिप बसवल्याने तो दुसरा व्यक्ती उशिरा जरी आला तरी आधीच्या उमेदवाराच्या पायात त्याची एक चिप असल्याने दुसऱ्या उमेदवाराची वेळ आधीच्या उमेदावाच्या वेळेला नोंद होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -