मुंबई पोलिसांकडून बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश, लाखों रुपयांच्या नोटा जप्त

Mumbai Police busted fake note printing factory in pydhonie arrested 47 year old man
मुंबई पोलिसांकडून बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश, लाखों रुपयांच्या नोटा जप्त

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाने धडक कारवाई करत बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचा पर्दफाश केला आहे. या कारवाईत लाखो रुपयांच्या नोटा देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील पायधुनी परिसरात हा नोटांचा कारखाना होता. या प्रकरणी एका ४७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून इतर साथीदारांचा गुप्ता वार्ता विभागाकडून शोध सुरु आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा गुप्तवार्ता विभागाच्या या कारवाईचे सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु केली आहे.

मुंबईतील पायधुनी परिसरात मुंबई पोलिसांच्या गुप्त वार्ता विभागाने एका बनावट नोटा छापण्याच्या कारखान्यावर छापेमारी केली. या कारवाईत भारतीय नोटा छापण्याचा कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला. पोलिसांनी या कारखान्यातून १ लाख ६० हजाराच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत. तर ४७ वर्षीय आरोपी शब्बीर हासम कुरेशीला अटक करण्यात आली आहे. चौकशी केल्यानंतर शब्बीरच्या घरातून पोलिसांनी एक संगणक प्रिंटर आणि बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त केले आहे. राहत्या घरीच आरोपी बनावट नोटा छापत होता.

आरोपी शब्बीर हासम हा मुंबईतील पायधुनी करिमी मंजील, नारायण ध्रुत स्ट्रीट येथे राहत होता. राहत्या घरीच शब्बीरने नोटा छापल्या असून मुंबईतील अनेक बाजार पेठांमध्ये या नोटा वितरित केल्या आहेत. शब्बीरविरोधात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आणि शब्बीरला अटक करण्यात आली आहे. आता त्याच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपी शब्बीरवर यापुर्वीही एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत पायधुनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची नोंद आहे.


हेही वाचा : कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकाला आज मिळू शकते मंजूरी; सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक