मोठी बातमी! आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून किरीट सोमय्यांना क्लीनचिट

bjp Kirit somaiya slams thackeray group and bmc on mumbai 100 crore COVID Center Scam

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा आणि माजी नगरसेवक नील सोमय्या यांना आयएनएस विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणातून मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणातून क्लिनचीट दिली आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेच्या माध्यमातून युद्धनौकेसाठी जमा केलेल्या कोट्यावधींच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप सोमय्या पिता पुत्रावर होता. मात्र या प्रकरणी सोमय्या पितापुत्रांविरोधात कोणतेही ठोस पुरावे न सापडल्याची कबुली मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोर्टात दिली आहे. लवकरचं या प्रकरणाचा अहवाल कोर्टासमोर सादर होत सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलात महत्त्वपूर्ण कामगिरी केलेल्या आयएनएस विक्रांत युद्धानौका जीर्ण झाल्याने ती भंगारात काढण्याबाबत विचार सुरु होता. मात्र ही युद्धनौका भंगारात काढण्याऐवजी तिची डागडूजी करत संग्रहायल रुपात जतन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, त्यावेळी भाजपचे खासदार असलेले किरीट सोमय्या आणि त्यांच्या पुत्राने पुढाकार घेत मुंबईत ठिकठिकाणी लोकांकडून मदतनिधी गोळा केला होता. भाजपचे अनेक, आमदार, लोकप्रतिनिधींनी रस्त्यावर उतरून गल्लीबोळ्यात लोकांकडे जाऊन निधी गोळा केला. यातून सुमारे 57 कोटींचा निधा गोळा झाला. मात्र या निधीचा सोमय्या पितापुत्राने अपहार केल्याचा आरोप करत माजी सैनिक बबन भोसले यांनी 7 एप्रिल 2022 रोजी ट्रॉम्बे पोलिसांत गुन्हा दाखल केला. त्यानुसार सोमय्या पिता पुत्राविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 429, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सोमय्या पिता पुत्राने अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली, मात्र सत्र न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी याचिका केली.

या मदतनिधीच्या माध्यमातून केवळ चर्चगेट स्थानकातून 11 हजार 224 रुपये जमा झाले होते. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही निधी गोळा झाला नसल्याचा दावा सोमय्यांच्या वतीने बाजू मांडताना केला गेला, यावर सोमय्यांनी किती रक्कम गोळा केली, त्याचा तपशील देण्याचे निर्देश कोर्टाने दिले. यावर अंदाजे रक्कम सांगता येईल, खरी रक्कम सांगता येणार नाही असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला. यानंतर कोर्टाने विक्रांत बचाव अभियानाच्या माध्यमातून कशाप्रकारे निधी गोळा केला आणि कोठे गोळा केला याबाबत लेखी तपशील देण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले होते. मात्र पोलीस त्यात अपयशी ठरल्याने सोमय्या पिता पुत्रांना अटकेपासून दिलासा देण्यात आला आहे.


मविआच्या मोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, संजय राऊतांचा इशारा