घरताज्या घडामोडीपवारांचा हुबेहूब आवाजाला वापरले एप, अखेर पोलिसांना सापडलाच

पवारांचा हुबेहूब आवाजाला वापरले एप, अखेर पोलिसांना सापडलाच

Subscribe

शरद पवार यांच्या आवाजाची नकल करणाऱ्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात शरद पवार यांच्या नावे कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीला शोधून काढण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. प्रशासकीय बदल्यांशी संबंधित प्रकरणांसाठी शरद पवार यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत त्या व्यक्तीने कॉल केला होता. पण शरद पवारांची नक्कल करणारी व्यक्ती शोधून काढण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात या व्यक्तीने फोन करत आपण शरद पवार बोलत असल्याचे सांगितले होते. तसेच प्रशासकीय बदल्यांशी संबंधित हा कॉल होता असे गृह विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे सांगत या व्यक्तीने प्रशासकीय बदल्यांसाठी कॉल केला होता. पण या कॉलचा संशय आल्यानेच मंत्रालयातूनच सिल्व्हर ओकला अशा कॉलबाबतची विचारणा करण्यात आली. त्यामध्ये हा कॉल खोटा असल्याचे समोर आले. त्यानंतरच कॉलशी संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची टीम कामाला लागली. मुंबईतील गावदेवी पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तसेच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने या प्रकरणात पुण्यातून एका व्यक्तीला ताब्यातही घेतले होते. या व्यक्तीसोबत आणखी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी रात्रीच गावदेवी पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदवल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. या व्यक्तीविरोदात फसवणुकींचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने याच प्रकरणात केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

या व्यक्तीने शरद पवारांचा आवाज काढण्यासाठी कॉल स्पुफिंग एपचा वापर केला होता. या एपच्या वापरामुळे एखाद्या व्यक्तीचा आवाज बदलून काढता येणे शक्य आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याआधीच पुण्यातील चाकण परिसरात एका जमीन खरेदी व्यवहारात ९ ऑगस्ट रोजी अशाच एका प्रकरणात आवाजाचा दुरूपयोग करण्यात आला होता. या प्रकरणातही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सध्या गृहखाते आहे. तसेच दिलीप वळसे पाटील हे गृह खात्याचे मंत्री आहेत.

काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावे मंत्रालयात बुधवारी रात्री एक फोन आला. शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून हा फोन केला आहे अशी माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. शरद पवारांचा आवाज काढत या व्यक्तीने मंत्रालयात कॉल केला होता. त्यामुळे काही काळासाठी मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोधाशोध करत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पडताळणीसाठी कॉल करण्याची वेळ आली. पण या कॉलची पडताळणी करण्यासाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन करण्यात आला. त्यानंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून नसल्याचे स्पष्ट झाले. मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

- Advertisement -

प्रतापराव खंडेबऱ्हाड यांनी धीरज पठारे यांच्याकडून उसनवारीवर पैसे घेतले होते. या उसनवारीच्या पैशांचा व्याजदर अधिक म्हणजे १० टक्के इतका होता. त्या आधारावरच १३ एकर जमीन नावावर करून द्यायला सांगितले. या व्यवहारात १ कोटींचे ५ कोटी रूपये असे वाढले. हे पैसे चक्रव्याढ व्याजाने वाढल्यानेच या प्रकरणातील रक्कम दिवसेंदिवस वाढतच गेली. ही जमीन विकू शकलो नाही म्हणून आणखी पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली. आणखी पैशांची मागणी केल्यानंतर सावकारीचा गुन्हा दाखल केला. जेव्हा पठारेंना अडचण आली तेव्हा त्यांनी युक्ती केली. त्यामध्ये व्यक्तीने शरद पवारांचा आवाज हुबेहून बोलण्यासाठी गुरव नावाच्या माणसाची मदत घेतली. त्यामध्ये किरण काकडे या व्यक्तीने फोन जोडून दिला. कॉम्प्युटरवरून कॉल केला जातो. दुसरा नंबर दाखवला जाऊ शकतो. त्या व्यक्तीने सिल्व्हर ओकच्या घरचा लॅण्डलाईन क्रमांकातून कॉल गेला आहे असे दाखवले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्यात आरोपीचा तापास सुरू होता. तिन्ही आरोपींचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू होता. या प्रकरणामध्ये एक गुन्हा पुण्यातील चाकण येथे दाखल झाला. तर दुसरा गुन्हा हा मुंबईत गावदेवी येथे दाखल करण्यात आला आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -