घर ताज्या घडामोडी मोठी बातमी! दोन बेस्ट बसच्या धडकेत पोलीस निरीक्षकाचा दुर्देवी मृत्यू

मोठी बातमी! दोन बेस्ट बसच्या धडकेत पोलीस निरीक्षकाचा दुर्देवी मृत्यू

Subscribe

बेस्टच्या दोन बसच्या धडकेत एका पोलीस निरीक्षकाचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास मुंबईतील वाकोला परिसरात ही घटना घडली. प्रवीण अशोक दिनकर असे मृत पोलीस निरीक्षकाचे नाव आहे.

बेस्टच्या दोन बसच्या धडकेत एका पोलीस निरीक्षकाचा चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास मुंबईतील वाकोला परिसरात ही घटना घडली. प्रवीण अशोक दिनकर असे मृत पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. (mumbai police inspector pravin ashok dinkar died in road accident crushed between two best buses at vakola)

न्यू मॉडर्न स्कूल जवळ, वाकोला मस्जिद या ठिकाणी सकाळी ९ वाजून ८ मिनिटांनी हा अपघात घडला. प्रवीण अशोक दिनकर हे सांताक्रुझ येथील आपल्या घरातून मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी वाकोला परिसरात ३९२ क्रमांकाच्या बेस्टच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली, अशी माहिती वाकोला पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नारायणकर यांनी दिली

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण अशोक दिनकर हे वाकोल्यातून जात असताना त्यांच्यापुढे असणाऱ्या बेस्टच्या बसमधून एक प्रवासी उतरत होता. त्यामुळे प्रवीण दिनकर हे बेस्ट बसच्या पाठिमागे थांबले होते. त्यावेळी मागून योणाऱ्या बेस्टची दुसरी बस भरधाव वेगात आली. बसचालकाने बसचा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, ब्रेक न लागल्याने ही बस पुढच्या बसवर जाऊन आदळली. त्यावेळी प्रवीण दिनकर हे दोन्ही बसेसच्या मधल्या भागात असल्याने ते चिरडले गेले.

या अपघातात प्रवीण दिनकर हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने व्ही.एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरु असताना 11:15 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुंबई पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – IMD Alert : राज्यात पुन्हा अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

- Advertisment -