राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस

राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Navneet rana and ravi rana bail will be canceled due to bite to the media against thackeray government

अमरावतीच्या राणा दाम्पत्याच्या (Rana Couple) अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) त्यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना वांद्रे न्यायालयात ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी रवी राणा मतदान करण्यासाठी जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा – नाराज नहीं, हैरान हूं मैं! सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टीका

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी निवडणूक होणार आहे. पाच जागांवर सहज निवडणूक (Rajyasabha Election) पार पडू शकते. मात्र, सहाव्या जागेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार (Sanjay Pawar) आणि भाजपचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) रिंगणात उतरले आहेत. ही सहावी जागा निवडून आणण्यासाठी अपक्ष उमेदवारांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे १० जून रोजी रवी राणा मतदानासाठी पोहोचू शकले नाहीत तर भाजपसाठी ही निवडणूक अटीतटीची होऊ शकेल.