घरमहाराष्ट्रमुंबईसह राज्यभरातील ८९ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या!

मुंबईसह राज्यभरातील ८९ पोलीस उपायुक्तांच्या बदल्या!

Subscribe

मुंबईसह राज्यभरातल्या तब्बल ८९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह राज्यभरातील ८९ पोलीस उपायुक्त पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृहविभागाकडून काढण्यात आले असून या बदल्यांमध्ये दक्षिण मुंबईतील महत्वाचे परिमंडळ म्हणून ओळख असणाऱ्या परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांचा समावेश आहे. तसेच परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांची पोलीस अधिक्षक म्हणून गुप्तवार्ता कक्ष येथे बदली करण्यात आली आहे. एटीएसचे पोलीस उपायुक्त मोहन दहीकर यांची बदली मुंबईत करण्यात आली असून परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांची बदली एटीएस मध्ये करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करून बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.


हेही वाचा – निधी चौधरी यांना ‘ते’ ट्विट भोवले; महापालिकेतून मंत्रालयात बदली

५ दिवसांत १९० बदल्या!

लोकसभा निवडणुकीनंतर रखडलेल्या राज्यातील पोलीस दलातील बदल्या आणि बढत्यांचे आदेश जारी करण्यास गृहविभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी राज्यभरातील १०१ सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर सोमवारी राज्यभरातील ८९ पोलीस उपायुक्त यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये मुंबईतील पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील परिमंडळ १ हे महत्वाचे मानले जाते. या ठिकाणी ठाणे येथून वर्षभरापूर्वीच बदली होऊन आलेले पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची राज्य पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. यांच्या काळात सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटना झाली होती. त्याचा तपास त्यांच्या परिमंडळात सुरु होता. त्यांची बदली वर्षभराच्या आतच झाल्यामुळे पोलीस दलात चर्चा सुरु होती. या बदल्यांपाठोपाठ सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या बढत्या काही दिवसांत येण्याची शक्यता गृह विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -