घरमहाराष्ट्रमी मुंबईत ब्लास्ट करणार आहे...', महिन्याभरात दुसरी धमकी; पोलीस सतर्क

मी मुंबईत ब्लास्ट करणार आहे…’, महिन्याभरात दुसरी धमकी; पोलीस सतर्क

Subscribe

एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याभरात दुसऱ्यांदा अशी धमकी देण्यात आली आहे. 

Mumbai Blast Threat Call: महाराष्ट्राची राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशत माजवण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. आतापर्यंत जिथे पोलिसांना फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून या धमक्या मिळत होत्या, तिथे आता एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईत दहशत माजवण्याची धमकी दिली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महिन्याभरात दुसऱ्यांदा अशी धमकी देण्यात आली आहे.  ( Mumbai Police received threat to terrorize the city via twitter a man said i am going to blast Mumbai soon )

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या ट्विटर अकाऊंटवर “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे” असा संदेश पाठवला होता. हा संदेश इंग्रजी भाषेत लिखित स्वरूपात पाठवण्यात आला होता. “I m gonna blast the mumbai very soon. हा संदेश गांभीर्याने घेत मुंबई पोलिसांनी संबंधित खात्याची चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

- Advertisement -

सायबर सेलला याबाबत माहिती देण्यात आली असून हे ट्वीटर अकाऊंट कोणाचं आहे? कुठून ते अपलोड होत होतं? याचा शोध घेण्यात येत आहे. कॉल फेक आहे का? या संदर्भात तपास देखील सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांना २६/११ सारख्या हल्ल्याच्या धमक्या

दुसरीकडे, रविवारी 21 मे रोजी एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून २६/११ हल्ल्याप्रमाणे शहरात हल्ला केला जाणार असल्याचं सांगितलं. पोलिसांना हा संशयास्पद कॉल राजस्थानमधून आला होता, त्यानंतर राजस्थान पोलिसांना याची माहिती देण्यात आली. या प्रकरणावर तत्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.

फेब्रुवारी महिन्यातही धमक्या

मुंबई पोलीस आणि एजन्सींना मुंबईत ब्लास्ट करण्याच्या धमक्या येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात एनआयएला धमकीचा ईमेल आला होता ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख होता. या ईमेलनंतर शहरभरातील पोलीस सतर्क झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -