घरताज्या घडामोडीपाळत ठेवल्याचा वानखेडेंचा आरोप मुंबई पोलीसांनी फेटाळला, चौकशी अहवालात सत्य समोर

पाळत ठेवल्याचा वानखेडेंचा आरोप मुंबई पोलीसांनी फेटाळला, चौकशी अहवालात सत्य समोर

Subscribe

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी काही दिवसांपुर्वी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार मुंबई पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली होती. ७ ऑक्टोबर रोजी समीर वानखेडे कब्रस्तानमध्ये गेले होते त्यावेळी त्यांच्यावर दोन अधिकारी पाळत ठेवत आहेत अशी तक्रार त्यांनी केली होती. या प्रकरणाचा तपास अप्पर दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आला. या तपासात ते दोन अधिकारी ओशिवारा येथील कब्रस्तानमध्ये सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी वानखेडे यांचे आरोप फेटाळले आहेत.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली असल्याची तक्रार केली होती. कॉर्डेलिया क्रूझवर केलेल्या कारवाईत समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे. या कारवाईनंतर आपल्यामागे पाळत ठेवण्यात येत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त यांनी दिले होते. अप्पर पोलीस दर्जाचे अधिकारी या प्रकाराचा तपास करत होते. प्रकरणाचा तपास करुन अधिकाऱ्यांनी एक अहवाल पोलीस आयुक्तांना सादर केला आहे. या अहवालात ओशिवारा पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल कब्रस्तानमध्ये सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

अहवालात सत्य आले समोर

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आईच्या दर्शनासाठी कब्रस्तानमध्ये जात असतात. वेळ मिळेल तेव्हा समीर वानखेडे या कब्रस्तानमध्ये येत असतात. यावेळी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालात असे म्हटलं आहे की, गाडी चोरीच्या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी ओशिवारा पोलीस ठाण्याचे दोन कॉन्स्टेबल कब्रस्तानमध्ये गेले होते. त्यावेळी योगायोगाने समीर वानखेडेही आले होते. वानखेडे या ठिकाणी येतात हे पोलिसांना देखील माहिती नव्हते. यामुळे हा निव्वळ योगायोग असू शकतो असे या अहवालात म्हटलं आहे.


हेही वाचा : Cruise Drugs Case: प्रभाकर साईलच्या खंडणी आरोपात काही तथ्य नाही – NCB

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -