घरक्राइम'त्या' बनावट कॉलसेंटर प्रकरणी 47 जणांना अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

‘त्या’ बनावट कॉलसेंटर प्रकरणी 47 जणांना अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून फेक कॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकताच मुंबई पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा (Fake Call Centre) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 47 जणांना अटक केली असून मोठा डेटा जप्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून फेक कॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकताच मुंबई पोलिसांनी एका बनावट कॉल सेंटरचा (Fake Call Centre) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 47 जणांना अटक केली असून मोठा डेटा जप्त केला आहे. मुंबई शहराच्या बाहेर असलेल्या राजोरी बीच या ठिकाणी पोलिसांनी ही कारवाई केली. (mumbai police traced a fake call centre on breakfast order tip 48 arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमधून पहाटे 4 वाजता नाश्ता ऑर्डर केला जायचा. त्या आधारे पोलिसांनी माग घेतला. या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांना संबंधित इमारत सोडून जाण्यास मनाई होती. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीशी संवाद साधू दिला जायचा नाही. पण या सेंटरमधील कर्मचाऱ्यांसाठी रोज पहाटे 4 वाजता जवळच्या एका विशिष्ट हॉटेलमध्ये नाश्त्याची ऑर्डर दिली जाय होती.

- Advertisement -

या बनावट कॉल सेंटरची माहिती मिळताच पोलिसांनी या कॉल सेंटरचा अधिक तपास केला. त्यावेळी पोलिसांना या सेंटरमधून दररोज पहाटे 4 वाजता कोणीतरी जवळच्या हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात नाश्ता ऑर्डर करत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. त्यावेळी या बीचच्या ठिकाणी वीकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी असते, पण इतर वेळी मात्र हे ठिकाण निर्जन असते. त्यामुळे या ठिकाणी काहीतरी अवैध गोष्ट सुरू असल्याचा पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी त्या जागेवर गुप्तपणे लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी या सेंटरवर छापा टाकून मालकासह 47 कर्मचाऱ्यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फसवणूक, तोतयागिरी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केंद्रातील जप्त केलेल्या संगणकांचीही फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्मचार्‍यांना ऑस्ट्रेलियातील संशयित बँक ग्राहकांचे कॉल रिसिव्ह करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्या ठिकाणी पोलिसांना अनेकांची संवेदनशील वैयक्तिक तपशील आणि वन-टाइम पासवर्डसह सुरक्षा माहिती मिळाली.


हेही वाचा – ‘अमित शाहांना जमीन म्हणजे काय…’ उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -