घरCORONA UPDATEबॉलिवूड कलाकारांच्या ट्विटला मुंबई पोलिसांचे फिल्मी स्टाईलने उत्तर!

बॉलिवूड कलाकारांच्या ट्विटला मुंबई पोलिसांचे फिल्मी स्टाईलने उत्तर!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मुंबई पोलिसांची स्तुती करणारे ट्विट केले आहे. लॉकडाऊनदरम्यान आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आहे.

कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन घोषित केला असून लोकांना घराबाहेर पडणे बंद झाले आहे. या परिस्थितीत सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी पोलीस यंत्रणा दिवस-रात्र मेहनत करत आहेत. प्रत्येक गल्ली, चौक आणि नाक्यावर पोलीस तैनात आहेत. अशावेळी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने मुंबई पोलिसांची स्तुती करणारे ट्विट केले आहे. लॉकडाऊनदरम्यान आपली जबाबदारी पार पडणाऱ्या पोलिसांचे आभार मानले आहे.

आलिया भट्ट म्हणते की, सर्वप्रथम मुंबई पोलिसांचे आभार. तुमच्या विषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील. आपल्या चाहत्यांना उद्देशून म्हणते की, पोलिसांसाठी तरी सगळ्यांनी घरामध्ये बसून राहा. मुंबई पोलिसांनी उत्तर दिले की, आम्ही आशा करतो की, तुम्ही सर्व लोक आलियाच्या सल्ल्यानुसार ‘राजी’ असाल. ‘गल्ली’ मधून कामाशिवाय बाहेर निघू नका. आणि आपल्या ‘डियर जिंदगी’ची काळजी घ्या, अशा फिल्मी शब्दात मुंबई पोलिसांनी ट्विट केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

याआधीही बॉलिवूड अभिनेता अजय देवगन याने ही मुंबई पोलिसांच्या कामाची स्तुती करणारी व्हिडिओ ट्विटरवर शेअर केली होती. यावेळी अजय देवगनच्या ट्विटला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये दिले आहे. अजय देवगनच्या गाजलेल्या चित्रपटांची नाव घेऊन ते म्हणतात की, डियर ‘सिंघम’, आम्ही तेच करतोय जे ‘खाकी’ला केले पाहिजे. आणि मुंबईला पुन्हा त्याच प्रमाणे बघता येईल, जशी पहिली दिसत होती- ‘वन्स ओपोन अ टाइम इन मुंबई.’

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -