Eco friendly bappa Competition
घर ठाणे मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; संपू्र्ण जानेवारी महिना ठरला प्रदूषित

मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली; संपू्र्ण जानेवारी महिना ठरला प्रदूषित

Subscribe

दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. यासाठी मुंबईतील वाढते हवा प्रदूषण कारणीभूत ठरत आहे.

दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. यासाठी मुंबईतील वाढते हवा प्रदूषण कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जानेवारी महिना प्रदूषित आढळल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. (mumbai pollution increase in pollution in mumbai thane navi mumbai kalyan entire month of january is polluted)

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत नुकताच एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या चारही औद्योगिक क्षेत्रात संपूर्ण जानेवारी महिना प्रदूषीत राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्रीन प्लॅनेट सोसायटीच्या सुरेश चोपणे यांनी अहवाल दिला आहे.

- Advertisement -

मुंबईतील प्रदूषणास धूलीकण, वाहनांची वाढती संख्या, बांधकाम, ज्वलन कचरा कारणीभूत आहे. सोबतच मुंबईची भौगोलिक परिस्थिती, वाऱ्याची संथ गती आणि हिवाळ्यातील कमी तापमान देखील कारणीभूत आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या हवा गुणवत्ता निर्देशांकाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे.

नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (National Clean Air Programme) अंतर्गत प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज असून, दिल्लीप्रमाणे अनेक अन्य उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक

- Advertisement -

मुंबई (पवई केंद्र)

 • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
 • समाधानकारक-(Satisfactory) : 02 दिवस
 • साधारण प्रदूषण(Moderate) :13 दिवस
 • जास्त प्रदूषण ( Poor) : 16 दिवस
 • धोकादायक प्रदूषण आढळले नाही

नवी मुंबई (महापे केंद्र)

 • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
 • समाधानकारक-(Satisfactory) : 01 दिवस
 • साधारण प्रदूषण (Moderate) :18 दिवस
 • जास्त प्रदूषण ( Poor) : 12 दिवस
 • धोकादायक प्रदूषण आढळले नाही

ठाणे (पिंपलेश्वर मंदिर केंद्र)

 • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
 • समाधानकारक (Satisfactory) : 00 दिवस
 • साधारण प्रदूषण (Moderate) : 14 दिवस
 • जास्त प्रदूषण ( Poor) : 14 दिवस
 • धोकादायक प्रदूषण (Very Poor) : 03 दिवस

कल्याण (खडकपाडा केंद्र)

 • चांगला निर्देशांक (Good) : 00 दिवस
 • समाधानकारक-(Satisfactory) : 00 दिवस
 • साधारण प्रदूषण (Moderate) : 22 दिवस
 • जास्त प्रदूषण ( Poor) : 09 दिवस
 • धोकादायक प्रदूषण आढळले नाही

मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा तोंड द्यावं लागत आहे. मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. सध्याच्या काळात श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा – पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलच्या मोटरमनला चक्कर आली अन्…; मालाड स्थानकातील घटना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -