घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोनाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वेवर आज एक विचित्र अपघात झाला. कोल्हापूरवरुन मुंबईला येणाऱ्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी

मुंबई- पुणे एक्सप्रेस आज सकाळी भीषण अपघात झाला. सोमाटणे फाटाजवळ भरधाव वेगात असलेल्या कार डिव्हायडरला जाऊन धडकली. ही कार कोल्हापूरवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. या भीषण अपघातामध्ये ४ जण जखमी झाले होते. मात्र उपचारा दरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोण जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. गाडीच्या चालकावर उपचार करुन सोडण्यात आले आहे. सर्व जखमींवर सोनाटणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असा झाला अपघात?

कोल्हापूरवरून काही प्रवासी मुंबईला येत होते. एक्स्प्रेस वे सुरू होताच गाडीचा वेग वाढला. काही अंतरावर पोहचताच सोमाटणे फोटा येथे चालकाला अचानक डोळा लागला. आणि भरधाव वेगात असलेली गाडी थेट डिव्हायडला जाऊन धडकली. डिव्हायडर गाडीतून आर-पार झाला होता. हा अपघात ऐवढा भीषण होता की गाडीतील प्रवासी वाचतील असे वाटले नव्हते. मात्र सुदैवाने सर्वजण वाचले. या अपघातामध्ये ४ जण जखमी झाले. पण उपचारादरम्यान अमोल पाटील यांचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -