घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू तर अनेक जखमी

Subscribe

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेववर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आत्तापर्यंत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. एक्स्प्रेस वेवरील बोरघाटात हा भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर ६ वाहनं एकमेकांना धडकून हा अपघात घडलेले आहे. अपघातातील मृतांमध्ये कोंबड्यावाहू टेम्पोतील एक व्यक्ती आणि कारमधील व्यक्तीचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे.

मुंबईकडे येणाऱ्या भरधाव कोंबड्यावाहू टेम्पोची एका बसला धडक बसली आणि त्यानंतर मागची पाच वाहनांची आपापसात धडक झाली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन टेम्पो, कार, खाजगी बस आणि ट्रेलर अशी सहा वाहन एकमेकांना आदळली आहेत. यामध्ये मुंबई लेनवरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली आहे.

- Advertisement -

खोपोलीदरम्यान झालेल्या या अपघातात टेम्पो-ट्रेलरच्यामध्ये एका कारचा चक्काचूर झाला असून कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहे.

अपघातास्थळी बचाव पथकाने धाव घेत अपघातग्रस्तांचे मदत कार्य सुरु केले आहे. यातील जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.


राशीभविष्यः सोमवार १८ ऑक्टोबर २०२१
 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -