घरताज्या घडामोडीमुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचे ब्रेक फेल, ३ गाड्यांना धडक

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचे ब्रेक फेल, ३ गाड्यांना धडक

Subscribe

ब्रेक फेल झालेल्या गॅस टँकरमध्ये प्राँपलेन गॅस

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दररोज अनेक अपघात होत असतात. एक्सप्रेस वेवरचे अपघात आपल्यासाठी काही नवीन नाहीत. मात्र आज झालेल्या अपघातामुळे मोठा अनर्थ होता होता टळला असे म्हणता येईल. खालापूर तालुक्यातील मौजे आडोशी हद्दीतील मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे ते मुंबई लेनवर एका गॅस टँकरने तब्बल ३ गाड्यांना धडक दिली. बोरघाट उतरत असताना अचानक गॅस टँकरचे ब्रेक फेल झाल्याने टँकर समोरील ३ गाड्यांवर जाऊन धडकला. या अपघातात ३ जण जखमी झाले आहेत. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

राज्यात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक्सप्रेस वेवर वरील वाहतूक फार कमी झाली आहे. त्यामुळे एक्सप्रेस वेवर जास्त वाहतूक नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेत जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने येणारा गॅस टँकरने एशियार टेम्पो, टाटा ट्रेलर आणि कंटेनर टेम्पोला जोरदार धडक दिली. या गॅस टँकरमध्ये प्राँपलेन गॅस होता. गॅस थोड्या प्रमाणात लीक झाल्याचे कळताच तात्काळ अग्नीशमन दलाच्या जवानांना बोलवण्यात आले.

- Advertisement -

प्राँपलेन गँसने भरलेला टँक अशाप्रकारे रस्त्यावर पडला आहे की मुंबईच्या दिशेने जाणारा संपूर्ण रस्ता बंद झाला आहे. प्राँपलेन हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ असल्याने टँकच्या बाजूने सुरक्षित वाहतूक करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा टँक बाजूला करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पोलिसांचा फौज फाटा एक्सप्रेस वेव दाखल झाला आहे. एक्सप्रेस वेवरुन मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूकही थांबवण्यात आली आहे.


हेही वाचा – VIDEO: मित्रासोबतचा सेल्फी मोबाईलवर ठेवला, पतीने संशय घेतल्यावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -