घरताज्या घडामोडीCoronavirus: पोलिसांनी रोखलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा सुसाट!

Coronavirus: पोलिसांनी रोखलेला मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा सुसाट!

Subscribe

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कमी होताच बंद करण्यात आलेला महामार्ग पुन्हा वाहतूकीसाठी सुरु करण्यात आला आहे.

अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन सरकारने केले आहे. तरी देखील मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडत आहेत. सोमवारी सकाळी अचानकपणे बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची मोठी गर्दी जमली. राज्यात लॉकडाऊन सुरु असताना नागरिकांनी दाखविलेल्या बेजाबदारपणामुळे संतापलेल्या नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे रोखून धरत पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक बंद केली. त्याचप्रमाणे अत्यावश्यक असेल तरच ओळखपत्र दाखवून सोडले जात होते. मात्र, दुपारपर्यंत वाहनांची संख्या कमी झाल्याने वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

वाहनांची संख्या कमी झाल्यावर वाहतुक सुरु

मोठी गर्दी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ कळंबोली येथे झाली होती. ही गर्दी टाळण्याच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद केली होती. अचानक वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक पोलिसांवर देखील मोठा ताण आला होता. मात्र, तात्पूर्ती वाहतूक थांबवण्यात आली होती. परंतु, संख्या कमी झाल्यावर पुन्हा एकदा द्रुतगती महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतुक उपायुक्त सुनील लोखंडे यांनी सांगितले. कारण नसताना घराबाहेर पडून वाहतूक कोंडी करणाऱ्या वाहन चालकांना यावेळी सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहन चालकांनी घराबाहरे पडावे, असे अवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: अरे बापरे, आता इंधनही मिळणार मर्यादित; वाचा किती रुपयाच मिळणार इंधन?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -