Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुलुंड येथे भिंत कोसळून दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू

मुलुंड येथे भिंत कोसळून दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू

स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दिलीप वर्मा यांना पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात नेले.

Related Story

- Advertisement -

मुलुंड ( प.) येथे एका गार्डनची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत दिलीप वर्मा (३५) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील माहिती, भाजपचे स्थानिक खासदार व नगरसेवक मनोज कोटक यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. मुलुंड ( पश्चिम), एलबीएस मार्ग, काल्पादेवी पाडा, सागर पार्क, पांडुरंग शाळेनजीक, वायदे चाळ या विभागात एका गार्डनची भिंत गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या दुर्घटनेत दिलीप वर्मा (३५) ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. यावेळी, स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दिलीप वर्मा यांना पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात नेले. मात्र तेथील डॉ. प्रदीप यांनी, दिलीप वर्मा यांना मृत झाल्याचे घोषित केले.

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांत सकाळपासून तुफान पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे,नवीमुंबई,उपनगरांत मुसळधार पाऊस पडतो आहे. मुंबईतील सखल भागात पाणी तुंबल्याने पुन्हा एकदा मुंबईकरांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. मुंबईत आता पुढील ३ ते ४ तास अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सकाळपासून मुंबईत १६० ते १८० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हावामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -