Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र साकीनाकामध्ये निर्भया! ३२ वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार

साकीनाकामध्ये निर्भया! ३२ वर्षीय महिलेवर अमानुष बलात्कार

गुप्तांगात रॉड घुसविल्याने दुखापत होऊन पिडीतेचा मृत्यू, मुख्य आरोपीस अटक आणि कोठडी

Related Story

- Advertisement -

लैगिंक अत्याचारानंतर एका 32 वर्षांच्या महिलेवर तिच्याच परिचित व्यक्तीने अमानुष मारहाण करुन तिच्या गुप्त भागावर रॉड घुसवला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली, रक्तस्त्राव झाल्याने तिचा राजावाडी रुग्णालयातच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पळून गेलेल्या आरोपी काही तासांत साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली आहे. मोहन कतरव चौहान असे या 40 वर्षांच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेल्या मुख्य आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने दहा दिवसांची (21 सप्टेंबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना अमानवी आणि निंदनीय असून हा खटला फास्टट्रक कोर्टात चालविण्याचा प्रयत्न राहिल असे मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. तपासाची सूत्रे एसीपी ज्योत्सना रासम यांच्याकडे सोपविण्यात आले असून एक महिन्यांचा या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला जाणार आहे. पिडीत महिलेचा पोलिसांना जबाब नोंदविता आला नाही, तरीही आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर ठेवला आहे. दरम्यान साकिनाका येथील घटनेचे देशभरात प्रचंड संतप्त पडसाड उमटले आहे.

32 वर्षांची पिडीत महिला साकिनाका परिसरात राहते. ती आणि आरोपी मोहन चौहान हे एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा साकिनाका येथील खैरानी रोड, रशीद कंपाऊंड, चांदीवली स्टेडिओसमोर एका सुरक्षारक्षकाला एक व्यक्ती टेम्पोमध्ये महिलेला बेदम मारहाण करीत असल्याचे दिसून आले. ही माहिती त्याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली. ही माहिती मिळताच साकिनाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण ढुमे व त्यांचे सहकारी अवघ्या दहा मिनिटांत तिथे दाखल झाले. घटनास्थळी गेल्यानंतर पोलिसांना एका टेम्पोमध्ये ही महिला गंभीर अवस्थेत पडल्याचे दिसून आले. तिच्या गुप्त भागातून रक्तस्त्राव होत होता. मात्र क्षणांचाही विलंब न करता एका पोलीस कर्मचार्‍याने त्याच टेम्पोतून तिला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर होती, त्यामुळे डॉक्टरांनी तिच्यावर तातडीने उपचार सुरु होते. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तिच्या गुप्त भागावर रक्तस्त्राव होत असल्याने रात्री उशिरा तिच्यावर ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र ती महिला बेशुद्धावस्थेत होती. प्रकृती गंभीर असल्याने तिला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी दुपारी बारा वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
दुसरीकडे साकिनाका पोलिसांनी कॉल करणार्‍या सुरक्षारक्षकाची जबानी नोंदवून त्याने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी मोहन चौहानविरुद्ध हत्येचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार, अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरु केला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेऊन काही तासांत साकिनाका परिसरातून मोहन चौहान याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच या महिलेवर लैंगिक अत्याचार करुन तिला अमानुषपणे मारहाण केली तसेच तिच्या गुप्त भागावर दुखापत केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याने आता पोलिसांनी हत्येच्या कलमाची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत शनिवारी दुपारी त्याला पोलीस बंदोबस्तात वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

तपासात मोहन हा मूळचा उत्तर प्रदेशच्या जौनपूरचा रहिवाशी आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून तो मुंबई शहरात वास्तव्यास आहे. सध्या तो साकिनाका परिसरात राहत होता. चालक म्हणून काम करणार्‍या मोहनला कधी कधी काम मिळत नव्हते. त्यामुे तो तिथेच कचरा गोळा करण्याचे काम करीत होता. रात्री तो तिथे फुटपाथवर झोपत होता. त्याला दारुसह ड्रग्ज सेवन करण्याचे व्यसन होते. त्याचे पिडीत महिलेसोबत प्रेमसंबंध होते. ते दोघेही काही वर्षांपासून लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशीपमध्ये राहत होते. मात्र त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. त्यातून तो तिला सतत मारहाण करीत होता. घटनेच्या रात्री या दोघांमध्ये अशाच एका कारणावरुन कडाक्याचे वाद झाले होते. त्यातून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिला अमानुष मारहाण केली होती. तिच्या गुप्तांगात लोखंडी रॉड घुसवून करुन तिला गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत तिथेच टाकून तो पळून गेला होता. मात्र तेथील एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये तो कैद झाला होता. या घटनेनंतर तो उत्तर प्रदेशातील गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. गावी जाण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली.

खटला फास्ट ट्रॅक कोर्टात

साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी त्यांनी यासंदर्भात चर्चा केली आहे. झालेली घटना निंदनीय असून हे कृत्य करणार्‍या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या प्रकरणी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री.

- Advertisement -